Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पंचायत समिती जावलीचा स्वच्छतेची दौड.

 पंचायत समिती जावलीचा  स्वच्छतेची दौड. 

 मेढा:- स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत कचरा मुक्त भारत अभियान 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2023 महात्मा गांधी जयंती औचित्य साधून स्वच्छता ही सेवा उपक्रम संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. पंचायत समिती जावली  येथे स्वच्छता ही सेवा या दिवशी  स्वच्छता रन या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. जावळी  पंचायत समिती चे गटविकास अधिकारी मा. श्री मनोज भोसले  साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री संजय धुमाळ  साहेब,तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्री भगवान मोहिते साहेब    उपस्थितीत होते.

स्वच्छता ही सेवा  अंतर्गत स्वच्छता  रन या  उपक्रमांतर्गत स्वच्छतेचे बॅनर्स होर्डिंग्स हाती घेऊन उपक्रमाविषयक प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. तसेच स्वच्छता रन च्या दरम्यान स्वच्छता विषयक घोषणा देण्यात आल्या. व उपक्रमा विषयक माहिती देताना व उपक्रमांतर्ग गावांमध्ये स्वच्छता, इत्यादी  प्लास्टिक कचरा संकलना बाबत स्वच्छता मोहीम राबवणे, एकेरी वापराच्या प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती केली.या प्रसंगी पंचायत समिती कार्यालयाकडील सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री कैलास गायकवाड साहेब, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री सुनिल उबाळे साहेब व श्री संजय नारकर साहेब,वरिष्ठ सहाय्यक श्री श्रीकांत रासकर ,श्रीमती सविता खताळ मॅडम ,विस्तार अधिकारी पंचायत श्री वसंतराव धनावडे साहेब,अंगणवाडी सुपरवायझर श्रीमती सपकाळ, श्रीमती पवार ,कृषी विस्तार अधिकारी श्री प्रशांत शिंदे साहेब, श्रीमती हेमलता येवले,श्री राऊत , तसेच आरोग्य विभाग,  सांख्यिकी विभाग,सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी घरकुल,नरेगा,आपले सरकार सेवा केंद्र, व बिआरसीचे श्री रमेश शिंदे , श्री संतोष जाधव,पाणी गुणवत्ताचे श्रीमती रुचा परामणे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments