Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

तीन ऑक्टोंबर पासून बेमुदत लेखणी बंद, महसूल कर्मचारी यांची थकित वेतन देण्याची मागणी.

 तीन ऑक्टोंबर पासून बेमुदत लेखणी बंद, महसूल कर्मचारी यांची थकित वेतन देण्याची मागणी

गेली दोन ते तीन महिने पगार  वेळेवर न मिळाल्याने सातारा जिल्हा महसूल खाते वर्ग 2 यांनी वेतन नियमित करावे म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की ,सन २०१६ च्या शासन परिपत्रकानुसार अपुरे वेतन होत असल्याने अधिकारी व कर्मचारी यांचे कुटुंबीयांना खुप त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना महामारी वेळी महिन्या करिता एकुण वार्षिक तरतुद पंधरा ते वीस टक्के खर्च करण्याच्या सुचना करून त्या व्यतिरिक्त अन्य खर्च हा वित्त विभागाच्या परवानगी शिवाय करू नये असे परिपत्रक शासनाने काढले आहे , तेव्हापासून कर्मचारी वेतनासाठी अनुदान प्रति महिना करण्यासाठी आलेले आहे. व तसे जिल्हा प्रशासनास कळविले होते. हे अनुदान एकाच वेळी आर्थिक वर्षासाठी उपलब्ध करून देण्यात येते तसेच शासन स्तरावर प्राधिकार पत्र काढण्यासाठी सुविधा उपलब्ध केली होती. व त्या मुळे अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन वेळेवर होत होते.  कर्मचारी यांची वैद्यकीय बिले,सुधारित वेतनश्रेणी फरक रक्कम, महागाई भत्ता ही रक्कम अद्याप मिळालेली नाही. वेतन देण्यासाठी २५ ते ३० दिवसांचा विलंब होत आहे.पुढील महिन्यात दसरा, दिवाळी हे सण तोंडावर आलेले असल्याने ‌वेळेवर पगार मिळाला म्हणून सात दिवसांचा अल्टिमेट दिली आहे. कर्मचारी यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्नांबाबत मात्र शासन उदासीन आहे म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले  आहे.या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष सागर कारंडे, कार्याध्यक्ष संतोष झणकर यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments