Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कॅफेच्या नावाखाली तरुण-तरुणींची रासलीला ; निर्भया पथकाचा छापा.

 कॅफेच्या नावाखाली तरुण-तरुणींची रासलीला ; निर्भया पथकाचा छापा.

कोल्हापूर : टाकाळा चौक येथे एका इमारतीच्या बेसमेंटला सुरू असलेल्या टोकियो कॅफेवर निर्भया पथकाने मंगळवार ( दि.26 ) रोजी दुपारी कारवाई केली. कॅफेच्या नावाखाली या ठिकाणी विनापरवाना लॉजिंग चालवलं जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.या ठिकाणी कंडोमची पाकीटे आढळून आली आहेत.या कारवाईमूळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसापासून निर्भया पथक सक्रिय झाले आहे. कोल्हापूर शहरातील शाळा ,महाविद्यालयाच्या परिसरामध्ये हुल्लडबाजी करणारे युवक युवती आणि शहरातील कॅफेमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांवर निर्भय पथकांकडून कारवाई केली जात आहे. आज टाकळा चौक येथे एका इमारतीच्या बेसमेंटला सुरू असलेल्या टोकियो कॅफेवर छापा टाकला.यावेळी या ठिकाणी लॉजिंग सारखी व्यवस्था असलेले बेड आणि कंडोमची पाकीटे आढळून आली.निर्भया पथकाला याठिकाणी सहा महाविद्यालयीन युवक -  युवती अश्लील चाळे करताना सापडले आहेत. निर्भया पथकाने त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया केली.अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांना आता न्यायालयात हजर होऊन दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.कॅफेच्या नावाखाली विनापरवाना लॉजिंग चालवणाऱ्या दोघा कॅफे मालकावर देखील निर्भया पथकाने कायदेशीर कारवाई केली. शहराच्या मध्यवस्तीत सुरू असलेल्या या बेकायदा कृत्यावर कारवाई केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.ही कारवाई निर्भया पथकाच्या सहायक फौजदार संगीता विटे,भाग्यश्री राख, विजया बरगे,स्मिता जाधव यांनी मिळून केली.

Post a Comment

0 Comments