Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महावितरण च्या हलगर्जीपणामुळे अंबवडे खुर्द येथील एकाची शेर्डी मृत्यूमुखी पडली आणि.

 महावितरण च्या हलगर्जीपणामुळे  अंबवडे खुर्द येथील एकाची शेर्डी मृत्यूमुखी पडली आणि.


सातारा: भोंदवडे येथील प्रकाश घाडगे यांच्या शेतात,अंबवडे खुर्द हद्दीत राहणारे गरीब,कातकरी समाजातील हनमंत परशुराम पवार यांची शेर्डी जात असताना विजेची तार अंगावर पडल्याने मृत्यूमुखी पडली, त्या शिर्डीजवळ तेथील दोन छोटी मुले (अंजली हणमंत पवार,वय 14.आणि करण हणमंत पवार,वय12 ) गेली असता त्या मुलांना देखील विजेच्या तारेचा शॉक लागला व ती दोन्ही मुले लांब फेकली गेली. त्यांना वाचवण्याकारिता दादू बंडू पवार वय 20वर्षे, हे सरसावले. सुदैवाने लहान दोन्ही मुलांना थोडीसी दुखापत झाली असली तरी जीव वाचला आहे. पण प्रश्न असा पडतो की झालेल्या प्रसंगात त्या गरीब कातकरी समाजातील गृहस्ताने न्याय कुणाकडे मागायचा? आणि त्याला भरपाई मिळून-मिळून किती मिळायची? त्याकरिता त्याला तलाठी पंचनामा, शिर्डीचा शववीच्छेदन अहवाल,तसेच शेर्डी खरेदी पावती, इत्यादी कागदपत्रे जमवावी लागून, प्रस्ताव टाकून वाट पाहत बसावे लागणार आहे. समाजात कोणतीही बाब दुर्लक्षित राहूच नये याकरिता सदैव तत्पर फ्रंटलाईन न्यूज

Post a Comment

0 Comments