वडूजचे कचरा संकुलन केंद्र आरोग्याला घातक.
वडूजचे कचरा संकुलन केंद्र आरोग्याला घातक.
---------------------------------
वडूज प्रतिनिधी
विक्रमसिंह काळे,
---------------------------------
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणची माहिती
वडूज - हिंगणे ता.खटाव आरोग्य व कुटुंब कल्याण विषयक अत्यावश्यक आकडेवारी प्राप्त करून घेण्यासाठी शासना तर्फे एका संस्थेला हासतांतरीत केले आहे. वडूज येथील येथील नगरपंचायत कचरा संकुलन केंद्र हे या परिसरातील गावे व वाड्या वस्त्यांच्या आरोग्याला हानिकारक असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना देऊन त्या पद्धतीचा वरिष्ठ पातळीवर अहवाल सादर केल्याचे स्पष्ट केले
दिवसेंदिवस गंभीर व आरोग्याला हानिकारक ठरत असलेले कचरा संकलन केंद्र या बाबत जरी नगरपंचायत प्रशासन गंभीर नसले तरी हिंगणे ग्रामस्थ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी सतर्क असल्याचे या सर्वशनाच्या माध्यमातून आढळून येते. सदर माहितीच्या आनुशंगाने केंद्र व राज्य स्तरावरील धोरणे ठरविण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांचे मार्फत महाराष्ट्र राज्या मध्ये राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणासाठी आयआयपीएस मुंबई येथील या संस्थेची निवड करण्यात आली असून सातारा जिल्ह्यातील सर्वेक्षणा करिता या संस्थे मार्फत मार्केट एक्स एल डाटा मँट्रीक्स प्रा.लि. हि उपसंस्था काम पाहत आहे . सद्या या सर्व्हेची दुसरी फेरी मध्ये गावातील कुटुंबाची तपशीलवार माहिती संकलित करत आहेत. या काळात गावातील आशा स्वयंसेवीका , आंगनवाडी कार्यकर्त्यां , आरोग्य सेवक - सेविका, सरपंच शालण दुबळे, उपसरपंच प्रभाकर निकम,आदी सह या मोहिमेत सहभागी आहेत.
गत तीन दिवसांपासून हिंगणे गावातील अनेक कुटुंबांचे सर्वेक्षण पार पडले . संस्थेचे प्रतिनिधी धम्मदीप खडसे यांनी या कचरा संकलन केंद्रास भेट दिली. या परिस्थितीत चार ते पाच गावे आणि वाड्या वस्त्या वरील ग्रामस्थांच्या आरोग्याला घातक असल्याचे सुचित केले. या संदर्भात सर्व ती माहिती संमधीत विभागाकडे आँनलाईन सुर्पद केली आहे अशी माहिती त्यांनी दिली.
फोटो - वडूज कचरा संकुलन केंद्राची पाहणी करताना संस्थेचे कर्मचारी व हिंगणे ग्रामस्थ.
Comments
Post a Comment