Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

स्व. माणिक पोदार लर्न स्कूल च्या विद्यार्थ्यांची नेत्रदिपक कामगिरी..जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत मिळविला द्वितीय क्रमांक

 स्व. माणिक पोदार लर्न स्कूल च्या विद्यार्थ्यांची नेत्रदिपक कामगिरी.जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत मिळविला द्वितीय क्रमांक.

शालेय क्रीडा स्पर्धा औरंगाबाद विभाग अंतर्गत हिंगोली जिल्ह्याच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये थ्रो बॉल स्पर्धेत वयोगट 17 वर्षाखालील  स्पर्धेचे आयोजन गिरगांव येथील बहिर्जी स्मारक विद्यालय, गिरगांव येथे दि.30/09/2023 रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत वयोगट 17 वर्षांमधून अलोक बगडिया, अर्णव जिरवणकर, देवांक कोठारी, स्वराज तापडिया,सुनील शिंदे, कृष्णा वाघ,शोर्य जिरवणकर,कृष्णा भुतेकर,स्वरित जोशी,व्यंकटेश चोपडे,अफाम शेख,सुरज पायघन यांनी  या जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.या यशामुळे विजयी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. या यशासाठी शाळेतील क्रीडा शिक्षक अजय भालेराव  तसेच शाळेतील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे अध्यक्ष, मुख्य विभाग प्रमुख, प्राचार्य, मुख्य व्यवस्थापक, शिक्षक कर्मचारी यांना दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या भावी स्पर्धेसाठी शाळेकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments