Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बोरगाव पोलिसांनी केला सव्वा सहा किलो गांजा जप्त !

 बोरगाव पोलिसांनी केला सव्वा सहा किलो  गांजा जप्त !

बोरगावं पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री तैलतुबडे यांनी दोन ठिकाण  धडक कारवाई  करत सुमारे सव्वा सहा किलो गांजा जप्त केला गोपनीय माहितीनुसार पहिली कारवाई ही कुसवडे गावात अशोक पांडुरंग पवार रा. कुसवडे. ता.जि. सातारा. यांनी त्यांच्या राहत्या घराजवळ गांजा लागवड केली होती त्यांच्या जवळून 5 किलो 130 ग्राम वजनाचा गांजा आणि 128500/ किंमतीचा गांजा सदृश्यवनस्पती हस्तगत करत कारवाई केली. तर दुसऱ्या कारवाईत अमोल आण्णा मोहिते रा. नागठाणे ता. जि. सातारा याच्यावर करत त्याच्या राहत्या घराशेजारी गांजा विक्री करीत असल्याने त्याच्यावर कारवाई केली गेली, 

सदर इसमा कडून 1 किलो 120 ग्राम  28000 हाजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून या कारवाईतील एकूण मिळून 1,56,500/ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे.सदर कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचाल दलाल,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलीस स्टेशनचे सपोनि मा. श्री. रवींद्र तैलतुबडे, पोलीस उपनिरीक्षक राजाराम निकम,सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री कराळे,पोलीस हवलदार अमोल सपकाळ,पोलीस हवलदार दादा स्वामी फायटर,पोलीस हवलदार सुनील कर्णे,पोलीस नाईक  दीपक मांडवे आणि प्रशांत चव्हाण,महिला पोलीस नाईक- नम्रता जाधव,पोलीस कॉन्स्टेबल संजय जाधव आणि दादा माने,इत्यादी पोलीस अधिकारी अंमलदार आणि श्रीमती सुजाता पाटील निवासी नायब तहसीलदार व फॉरेन्सिक युनिट सातारा,येथील पोलीस हावलदार मोहन नाचण,पोलीस हवा. रुद्रायन राऊत, पोलीस काँ.अमोल निकम व नार्कोटीक डॉग युनिट पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री धनावडे, डॉग हॅण्डलर पो कॉ. दत्तात्रय चव्हाण,व आंमली पदार्थ शोधक श्वान सूचक हे सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments