रामदास धर्माधिकारी यांचे गावासाठी योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी .. मा .आ . श्री .छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले.ओझरे येथे एस .टी. उद्घाटन संपन्न.

 रामदास धर्माधिकारी यांचे गावासाठी योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी .. मा .आ . श्री .छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले.ओझरे येथे एस .टी. उद्घाटन संपन्न.


ओझरे येथे युवा नेते श्री . रामदास धर्माधिकारी यांनी स्वतःच्या जागेत वडीलांच्या स्मरणार्थ एस .टी. बसस्थानक स्वखर्चाने बांधून दिले . तसेच आईच्या स्मरणार्थ दुर्गामाता मंडळासाठी स्वतःच्या जागेत स्वखर्चाने संपूर्ण स्टेज बांधून दिले .आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी स्वखर्याने राबवले आहेत . अन्नदान , पारायण सोहळ्यासाठी मदत , शैक्षणिक साहित्य वाटप , महिलांसाठी साडी वाटप असे विविध कार्यक्रम त्यांनी राबवले आहेत त्यांच्या या योगदानाबद्दल श्री . छ . आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांचे कौतुक केले आणि सपत्नीक सत्कार केला . धर्माधिकारी यांच्या गावाच्या योगदानासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या . श्री . धर्माधिकारी यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित असून ती कॅनडा येथे नोकरीनिमित्त आहेत . त्यांच्या प्रत्येक सामाजिक कामात त्यांच्या पत्नी सौ . सविता धर्माधिकारी यांची खंबीर साथ असते .ओझऱ्याचे सरपंच यांनी रामदास धर्माधिकारी यांच्या सामाजिक योगदानाची माहिती दिली आणि गावातील अनेक विकासकामे मार्गी लावल्याबद्दल महाराज साहेबांचे आभार मानले.

      या कार्यक्रमास श्री .मच्छिंद्र क्षीरसागर ,श्री .बजरंग चौधरी , श्री . पुंडलिक पार्टे, श्री . अजितराव    मर्देकर सरपंच , श्री . अजित( बाळू ) मर्देकर उपसरपंय , श्री . राजेंद्र लकडे चेअरमन वि . का .स. सोसायटी , सर्व ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ , माहिलावर्ग , दूर्गामाता मंडळाचे सदस्य उपस्थित होते . संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .विजयराव मर्ढेकर यांनी केले आणि आभारही मानले .

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.