Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

स्वतःच्या सख्ख्या भावाच्या घरासह विविध ठिकाणी घरफोडी करणारा शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात.

 स्वतःच्या सख्ख्या भावाच्या घरासह विविध ठिकाणी घरफोडी करणारा शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात.

स्वतःच्या सख्ख्या भावाच्या घरासह विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या  विठ्ठल सखाराम पाटील ( वय  ४८ रा.कुरनी ता.कागल ) याला शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. त्याच्याकडून ८ लाख ९० हजार रुपये किमतीचे सुमारे १७ तोळे दागिने जप्त केले आहेत.अशी माहिती पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.

मध्यवृती बस स्थानक परिसरात 10 सप्टेंबरला एका महिलेची सोन्याचे दागिने असणारी पर्स चोरीस गेली होती. याप्रकरणी 'कविता प्रवीण पाटील (रा- पालकरवडी ता.राधानगरी )यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात आज्ञता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना ही चोरी कागल तालुक्यातील कुरणी इथल्या विठ्ठल सखाराम पाटील यांन केल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकने विठ्ठल पाटील याला ९ ऑक्टोबर रोजी अटक केली.अधिक चौकशी केली असता त्याने मध्यवर्ती बस स्थानक परिसरात केलेल्या चोरीची कबुली दिली.तर मुरगुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या त्याच्या सख्या भावाच्या घरी चोरी केल्याचं देखील चौकशीत निष्पन्न झाले. त्याच बरोबर  मुरगुड आणि राधानगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील प्रत्येकी एक घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ८ लाख ९० हजार रुपये किमतीचे सुमारे १७ तोळे वाजनचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार संदीप जाधव हवालदार संजय जाधव मिलिंद बांगर लखनसिंह पाटील ,शुभम संकपाळ, बाबासाहेब ढाकणे ,रवी आंबेकर विकास चौगुले महेश पाटील यांनी मिळून केलीय.अशी माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे.

Post a Comment

0 Comments