Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुरगूड येथे मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण.

 मुरगूड येथे मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण.

-----------------------------------------------------------------------


-----------------------------------------------------------------------

मुरगूड -येथील सकल मराठा समाज आणि नागरिकांच्या वतीने शिवतीर्थ मुरगुड येथे बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली . सकाळी ग्रामदैवत अंबाबाई मातेस पुष्पहार घालून अंबाबाई मंदिरापासून तुकाराम चौक येथील हुतात्मा तुकाराम भारमल यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रॅली उपोषणा ठिकाणी आली . यानंतर साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली . महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मराठा आरक्षणाचे आंदोलने सुरू आहेत . अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे .तसेच अनेक ठिकाणी उपोषणाचा हत्यार उभारण्यात आले आहे . मराठा समाजाला आरक्षणासाठी मनोज जरांगे - पाटील यांचे उपोषण सुरू होते . सरकारने यावरती निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला होता तो वेळ पूर्ण झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे .यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र हे आंदोलन तीव्र करण्यात आले असून . याचाच एक भाग म्हणून मुरगूड शहरातील नागरिकांनी तसेच सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन मुरगुड मध्ये राजकीय सभांना बंदी तसेच बेमुदत साखळी उपोषण करण्याचं जाहीर केलं होते . त्यानुसार सोमवारी सकाळी दहा वाजले पासून शिवतीर्थ मुरगुड येथे उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षण मिळत नाही अथवा त्यावर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हे सकाळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला यावेळी पहिल्या दिवशी संतोष भोसले,मयूर सावर्डेकर ,ओंकार पोतदार,सर्जेराव भाट ,अभि मिटके,विशाल मंडलिक,रणजित मेंगाणे, अजित मेंडके यांनी उपोषणास प्रारंभ केला . यावेळी

स्वागत दत्ता मंडलिक यांनी  केले .

महादेव सुतार ,चंद्रकांत जाधव ,मारुती चौगले, अॅड सुधीर सावर्डेकर,नामदेव मेंडके,बजरंग सोनूले ,सोमनाथ एरनाळकर ,एकनाथ देशमुख,जगन्नाथ पुजारी ,तानाजी गोधडे ,मारुती कांबळे ,संजय घोडके ,संतोष भोसले ,नलिनी सोनाळे , (सरपंच मळगे बु), धनाजी पाटील ,कृष्णात सोनाळे ,रुपाली पाटील (मळगे बु),राजेखान जमादार,सुखदेव येरुडकर ,रणजित सूर्यवंशी,दगडू शेणवी यांनी मनोगत व्यक्त केली . यावेळी सकल मराठा समाजास  ओ .बी.सी. संघटनेचा  ,धनगर समाजाचा ,मार्तंग समाजाचा ,मागासवर्गीय समाज  ,मुस्लिम समाज ,मळगे बु ग्रामपंचायत ,शिवसेना अशा अनेक समाजानी पाठिंबा जाहीर केला .

Post a Comment

0 Comments