Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक टपाल दिनानिमित्त दुधगंगा व्हॅली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिली पोस्ट ऑफिस ला भेट.

 जागतिक टपाल दिनानिमित्त दुधगंगा व्हॅली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिली पोस्ट ऑफिस ला भेट.

-----------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------
 जागतिक टपाल दिन किंवा 'वल्ड पोस्ट डे' हा जगभरातून साजर केला जातो.दरवर्षी ९ ऑक्टोबरला हा दिवस साजरा केला जातो. इंटरनेटच्या काळात आजही लोक टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावर विश्वास कायम आहे.एका शहरातून दुसरीकडे टपाल पाठविण्याच सर्वात सोप आणि स्वस्त साधन आहे ते म्हणजे पोस्ट सेवा फक्त देशात नाही तर जगात कोणत्याही देशात टपाल पाठविण्यासाठी या सेवेचा लाभ घेण्यात येतो.आजच्या मोबाईलच्या युगात या सेवेची माहिती विद्यार्थ्यांना माहित व्हावी यासाठी  जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून दुधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल इस्पूर्ली ता.करवीर या शाळेतील विद्यार्थ्यांनी पोस्ट ऑफिस ला भेट दिली.

      यावेळी विद्यार्थ्यांना इस्पुर्ली पोस्ट ऑफिसचे सब पोस्ट मास्तर बाजीराव पाटील साहेब यांनी विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांची माहिती दिली त्यामध्ये बचत खाते,रिकरिंग योजना,मंथली इन्कम स्कीम, जेष्ठ नागरिक योजना, नॅशनल सेव्हिंग स्कीम, किसान विकास पत्र,खास मुलांसाठी पब्लिक प्रायव्हेट फंड,तर मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना अशा अनेक योजना संबंधित माहिती त्यांनी दिली.

    यावेळी मुलांना पोस्ट कार्ड आंतरदेशीय पत्र, पाकिटातून पाठवली जाणारी पत्रे, विविध प्रकारचे स्टॅम्प या संदर्भात ही माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

       यासोबतच कोल्हापूर जिल्हा पोस्ट ऑफिस मधुन कशाप्रकारे पत्रव्यवहार केला जातो व जिल्ह्यातील ९६ सब पोस्ट ऑफिस संदर्भात देखील माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील विविध शंकांचे समाधान देखील त्यांनी केले. पोस्ट ऑफिस च्या संपूर्ण कामकाजाची  माहिती दिल्याबद्दल अधिकार व कर्मचारी यांचे आभार शाळेचे शिक्षक भिकाजी वागरे सर यांनी मानले 

    यावेळी पोस्ट ऑफिस चे सब पोस्ट मास्तर बाजीराव पाटील, विराज मोरे सर, दिपक मिरजकर सर, पोस्टमन के.डी. रावण  साहेब शाळेचे शिक्षक एस.डि.कुंभार सर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments