लोकशाहीचे चारीस्तंभ दबावाखाली असल्याने शिवसेना न्याय मागण्यास जनतेच्या दरबारात.
लोकशाहीचे चारीस्तंभ दबावाखाली असल्याने शिवसेना न्याय मागण्यास जनतेच्या दरबारात.
भास्कर जाधव : उचगावात होऊ द्या चर्चा अभियान : मोठा जनसमुदाय
उंचगाव;-लोकशाहीचे चारी स्तंभ आज दबावाखाली असल्यानेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला केंद्र शासनाच्या निषेधार्थ जनतेच्या दरबारात जावे लागत आहे, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी उचगाव (ता. करवीर) येथे आयोजित 'होऊ द्या चर्चा' या अभियानानिमित्त आयोजित जाहीर सभेत मोठ्या जनसमुदायासमोर श्री जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर होते. लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण पैलवान प्रमुख पाहुणे होते. भास्कर जाधव यांनी केंद्रातील भाजप व राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासनाचा खरपूस समाचार घेत त्यांच्या फसव्या योजनांचे भांडाफोड केले.
सर्वसामान्य जनतेच्या मानगुटीवर दिल्लीच्या गोडबोल्या बाबाने महागाईचा राक्षस बसवला असल्याचे स्पष्ट करताना आमदार जाधव म्हणाले की मागील लोकसभा निवडणुकीवेळी त्यांच्या ज्या प्रचाराच्या चित्रफिती होत्या त्या पाहिल्यानंतर त्यावेळची महागाई आणि आजची जीवघेणी महागाई लक्षात येते आणि हा बोलघेवडा बाबा किती खोटे बोलतो, याचे प्रत्यंतर येते. आज व्यापारी, शेतकरी, कामगार, शेतमजूर, लहान उद्योजक, शासकीय नोकर अस्वस्थ का झाले आहेत, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. महागाई आणि खाजगीकरणाच्या भुतामुळे सर्वजण चिंताग्रस्त बनले आहेत. प्रत्येकाच्या बँक खात्यात बारा लाख येणार, अशा पोकळ घोषणा यापुढे चालणार नाहीत. जनता आता फसणार नाही. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत जनता भाजपचा पराभव करण्यासाठी आतुर झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व महाविकास भाजपला भाजपला नक्कीच सत्तेवरून खाली खेचेल, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला.
पुणे शहर समन्वयक प्रा विद्याताई होडे यांनी केंद्र शासनाच्या बोलघेवड्या घोषणा आणि योजनांवर सडकून टीका केली. अच्छे दिन आले का, असा सवाल त्यांनी विचारला, त्यावेळी अच्छे नही बुरे दिन आये है.... असे मोठ्या आवाजात जमावाने उत्तर दिले.
उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट यांनी मान्यवरांचे स्वागत केले,व व म्हणाले की शिवसेना केवळ वचन देत नसते तर ती वचनपूर्ती करत असते ,करवीर तालुकाप्रमुख राजू यादव बोलताना म्हणाले की हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेला 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हा मंत्र उंचगाव मधील आम्ही शिवसैनिक निराधारांची पेन्शन बँक आपल्या दारी या योजनेअंतर्गत वाटप करताना करत आहे तसेच उद्योगपती मोठमोठ्या कर्जाची रक्कम बुडवून देशाला डबघाईला आणत आहेत मग गोरगरिबांची पेन्शन 5000 का व्हायला नको असा सवाल करत करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी प्रसंगी प्रशासनाशी आंदोलनाच्या माध्यमातून लढून पेन्शन वाढ केल्याशिवाय थांबायचं नाही असा इशाराही दिला,
जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, उचगावप्रमुख दीपक रेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. करवीर तालुकाप्रमुख राजू यादव माजी सरपंच मालूताई काळे, करवीरचे माजी सभापती प्रदीप झांबरे दक्षिण विधानसभेचे संपर्कप्रमुख मंगेश साळवी , कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळुखे, दीपक पाटील ,विक्रम चौगुले, विनोद खोत ,विराज पाटील, सागर पाटील, विरागकरी ,अरविंद शिंदे ,सुनील चौगुले ,योगेश लोहार, संतोष चौगुले ,कैलास जाधव, बाळासाहेब नलवडे, वैभव पाटील, अजित चव्हाण, अजित पाटील ,शिवाजी लोहार , युवा सेना जिल्हाधिकारी मंजीत माने, शहर समन्वयक हर्षल सुर्वे ,स्मिता मांढरे अरुण अबदागिरी, वाहतूक सेनेचे हर्षल पाटील, वाहतूक सेनेचे दत्तात्रय फराकटे,शांताराम पाटील, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट १...
पाच हजारांची पेन्शन द्या
संजय गांधी निराधार अशा शासनाच्या विविध योजना असून आता मिळणारी पेन्शनची रक्कम भाजीपाल्यालासुद्धा पुरत नाही. म्हणून ती पेन्शन पाच हजार रुपये झाली पाहिजे, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांच्याकडे तालुकाप्रमुख राजू यादव यांनी केली आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पेन्शनधारकांनी या मागणीचे टाळ्यांच्या गडगडाटात स्वागत केले.
चौकट दोन....
देशातील प्रमुख तथाकथित भांडवलदार उद्योगपतींचे मोदी सरकारने अगणित कर्ज माफ केले. मात्र महागाई ने त्रस्त आणि कर्जबाजारी झालेल्या सामान्य शेतकरी, कामगारांसह सामान्य जनतेच्या कर्जात दिवसागणिक वाढ होत आहे, हे घृणास्पद आहे, अशी व्यथा गावप्रमुख दीपक रेडेकर यांनी मांडली.#
....फोटो ओळी.....
उचगाव ता. करवीर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आयोजित होऊ द्या चर्चा या अभियान प्रसंगी बोलताना आमदार भास्कर जाधव. शेजारी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवने, सरपंच मधुकर चव्हाण, प्रा. विद्याताई होडे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, पोपट दांगट, दक्षिण संपर्क प्रमुख मंगेश साळवी विराग करी अरविंद शिंदे विक्रम चौगुले दीपक पाटील अवधूत साळुखे सुनील चौगुले कैलास जाधव बाळासाहेब नलवडे योगेश लोहार विराज पाटील विनोद खोत राहुल गिरुले मंजीत माने शहर प्रमुख सुनील मोदीव मान्यवर.
Comments
Post a Comment