नुतन गटविकास अधिकारी अधिकारी सतीश बुदधे यांचे फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्रचे वतीने स्वागत करताना.

 नुतन गटविकास अधिकारी अधिकारी सतीश बुदधे यांचे फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्रचे वतीने स्वागत करताना.

सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी सतीश बुदधे यांची नियुक्ती, फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्रचे वतीने स्वागत.

सातारा पंचायत समिती मध्ये ‌ पुर्ण वेळ गटविकास अधिकारी नसल्याने प्रशासकीय कामकाज करताना अडचणी निर्माण होत होत्या. शासनाने या बाबींचा विचार करून   नुकतीच सतिश बुदधे यांची सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी नियुक्ती केल्याचे पुर्ण वेळ गटविकास अधिकारी मिळाल्याने कामकाजात गतिमानता येणार आहे.  आजच त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र चॅनलचे वतीने सातारा जिल्हा प्रतिनिधी किरण अडागळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नुतन गटविकास अधिकारी सतीश बुदधे यांनी सांगितले की, प्रशासनाचे काम चांगल्याप्रकारे व शासनाच्या नियमाप्रमाणे करणार आहे. कामकाजात पत्रकारांचे सहकार्य मिळावे. नुतन गटविकास अधिकारी यांनी यापूर्वी जावळी येथे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून काम केले आहे.तसेच ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था मांजरी जिल्हा पुणे येथे व्याख्याता म्हणून काम केले आहे.  यापूर्वी खंडाळयाचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्या कडे अतिरिक्त कार्यभार होता.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.