Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वैरणीचा भारा अंगावर पडलेल्या घोटवडेतील युवकाचा मृत्यू.

 वैरणीचा  भारा अंगावर  पडलेल्या घोटवडेतील युवकाचा मृत्यू.

शेतीतून वैरणीचा भारा घेऊन येताना भारा अंगावर  पडलेल्या घोटवडे ता.राधानगरी  येथील युवकांस मणक्याच्या गंभीर  इजा झाल्या होत्या.उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मावळली.अमर बंडोपंत डोंगळे (वय ४४) असे युवकाचे नाव असून त्याच्या मृत्यूने घोटवडे गावावर शोककळा पसरली आहे.

        घोटवडे येथील ग्रामपंचायत कार्यालयात संगणक चालक म्हणून अनेक वर्षांपासून अमर काम करत होता.घरची परिस्थिती बेताची असल्याने हनुमान दूध संस्थेत लिपिक म्हणून काम करत होता.सकाळी नेहमीप्रमाणे वैरणीचा भारा आणण्यासाठी अमर गेला होता.भारा कापून झाला आणि मोटर सायकल पर्यंत घेऊन जात असताना तोल जाऊन पडल्याने त्याच्या मणक्याला गंभीर इजा झाली. होती.कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर एकवीस दिवस उपचार सुरू होते.

 मणक्यावर शस्त्रक्रिया झाली होती. मात्र अचानक त्याची शारीरिक स्थिती बिघडली आणि त्याची प्राणज्योत मावळली .त्याचा शांत स्वभाव आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्याच्या पश्यात पत्नी ,आई,तीन मुली, पुतणे असा परिवार आहे.सदर घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे.

चार वर्षांपूर्वी भावाचे निधन

चार वर्षांपूर्वी औषधविक्रेता असलेला भाऊ ह्दयविकाराने अचानक  मरण . त्याचा चौथा स्मृर्ती दिन चार दिवसांपूर्वी झाला होता.संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अमर वर होती

 मात्र नियतीच्या घाल्याने आधार  निघून गेला.

Post a Comment

0 Comments