तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार.
तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार.
तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी इम्रानखान शेरखान पठाण या संशयिताला लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 25 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मूळची मुंबईची असणारी, पण कामानिमित्त कोल्हापूर शहरातील आर .के .नगर परिसरात राहणाऱ्या तरुणीची याच परिसरात राहणाऱ्या इम्रानखान शेरखान पठाण याच्याशी ओळख झाली. इम्रानखान याने ओळखीचा फायदा घेऊन तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचं आमिष दाखवून वर्षभर तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिला फोटो व्हायरल करण्याची भीती घालून जीवे मारण्याची धमकी दिली. लक्ष्मीपुरी पोलिसांनी इम्रानखानला बुधवारी रात्री उशिरा आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल परिसरातून ताब्यात घेतले.
घाबरलेल्या पीडितेने याप्रकरणी मनसेच्या एका पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. मंगळवारी सायंकाळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांंनी संबंधित तरुणीला घेऊन लक्ष्मीपुरी पोलिसांत तक्रार दिली. शुक्रवारी संशयितास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 25 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील करत आहेत.
Comments
Post a Comment