Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पन्हाळा येथील पन्हाळा पंचायत समितीच्या वतीने भारत देशाच्या अमृतमहोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित अमृत कलश यात्रेच्या शुभारंभ आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते संपन्न.

 पन्हाळा येथील पन्हाळा पंचायत समितीच्या वतीने भारत देशाच्या अमृतमहोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित अमृत कलश यात्रेच्या शुभारंभ आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते  संपन्न.


पन्हाळा तालुक्यातील प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी आणलेली मातीचे पूजन पंचायत समिती कार्यालय समोर आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच पन्हाळा तालुक्यातील अंगणवाडी व ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त कर्मचाऱ्यांना आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते नियुक्त पत्राचे वाटप करण्यात आले.

पन्हाळा पंचायत समिती कार्यालय ते बाजी प्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यापर्यंत पारंपारिक वाद्यांवर पायी दिंडी मिरवणूक काढण्यात आली.बाजी प्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संकलन माती एकत्रित दिल्लीला रवाना करणेसाठी पाठवण्यात आली.

ऐतिहासिक भूमीतून पाठवलेल्या मातीसोबत आपल्या भावना पण पोहचल्या पाहिजेत. तसेच ऐतिहासिक पन्हाळा तालुक्यातील मातीचा सुगंध देशाच्या कानाकोपऱ्यात दरवळला पाहिजे आणि देशात पन्हाळगड अग्रभागी राहिला पाहिजे,असे प्रतिपादन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केले.

यावेळी पन्हाळा - शाहूवाडी प्रांत आधिकारी समीर शिंगटे,पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे,गट विकास आधिकारी सोनाली माडकर, पन्हाळा नगरपरिषदेचे मुख्यधिकारी चेतनकुमार माळी यांच्यासह पन्हाळा तालुक्यातील सर्व सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments