Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जावळीच्या सकल मराठा समाजाचा राजधानीत मराठा आरक्षण मागणी साठी तहसीलदार यांना निवेदन व टुव्हिलर रॅली .

 जावळीच्या  सकल मराठा समाजाचा राजधानीत मराठा आरक्षण मागणी साठी तहसीलदार   यांना निवेदन व टुव्हिलर  रॅली .

भणंग प्रतिनिधी  : मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यभर साखळी उपोषणे, राजकीय नेत्यांना गावबंदी तसेच प्रबोधन प्रचार इत्यादी कार्यक्रम सुरू आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुळ जावली तालुक्यासह सातारा जिल्ह्यातही आरक्षणाचा विषय ऐरणीवर आहे  काल सोमवारी जावळीची राजधानी मेढा येथे मराठा समाजाला त्वरीत आरक्षण मिळावे  यासाठी जिवाची बाजी पणाला लावणारे मराठा योद्दा मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देणेसाठी सुमारे  हजारो सकल मराठा समाज जावली बांधवांनी मेढा शहरातून दुचाकी रॅली काढली.


आंदोलनाचे संवेदनशील स्वरूप लक्षात घेऊन मेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी योग्य  ती काळली घेतली होती .

सर्वप्रथम मेढा नगरीचे ग्राम दैवत भैरवनाथाचे मंदिरामधे सर्व मराठा बांधव एकत्र आले त्यानंतर ही दुचाकी रॅली भैरवनाथ मंदिर मेढा - कुंभारवाडा - वेण्णा हायस्कूल - वेण्णा चौक - आंबेडकर नगर चौक - एस टी डेपो - शिंदे कोयना हॉटेल  मार्गे तहसीलदार यांना निवेदन दिले त्यानंतर चांदणी चौक - गणपती मंदिर - सिव्हिल हॉस्पिटल मार्गे  मेढा पोलीस स्टेशन ला निवेदन देवून रॅली छत्रपती शिवाजी महाराज बाजार चौक मेढा येथे आली.

'आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा', अशी जोरदार घोषणाबाजी या रॅलीमध्ये करण्यात आली. या रॅलीने संपूर्ण मेढा शहर भगवेमय झाले होते मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पदाधिकारी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जावळीतील मराठ्यांची वाघीण कुमारी अक्षदा तरडे बामणोली हीने आपलं परखड मत व्यक्त केले. 

शिवभक्त शुभम तरडे म्हणाले मराठ्यांनो आताच जागे व्हा नाहीतर तुम्हाला असेच मरावं लागेल अस परखड मत मांडले.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे जावली तालुका अध्यक्ष दादा करंदकर म्हणाले कोणीही मतदानावर बहिष्कार न टाकता अरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या  विरोधात उभे रहा.

जो पर्यत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यत कोणत्याही पक्षाचं काम करणार नाही म्हणून शिवसैनिक सचिन जवळ ,सचिन करंजेकर,जितिन वेंदे, नामदेव चिकणे इतर पदाधिकार्यानी आपले पदाचे राजीनामा दिले.

दत्ता पवार मंदाकिनी भिलारे,महेश पवार ,सुरेश पार्टे, सचिन करंजेकर शिवाजीराव देशमुख , शुभम तरडे, मारुती चिकणे बजरंग चौधरी चंद्रकांत धनावडे,मेढा नगरीचे मागदर्शक पांडूरंग जवळ विलास बाबा जवळ यांनी मनोगत व्यक्त केले.

चौकट

आरक्षणाचे घोंगडे फार काळ भिजत ठेवू नका,आरक्षणाच्या संदर्भात त्वरीत कार्यवाही करावी अन्यथा आरक्षण न दिल्यास येणाऱ्या निवडणुकीत जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा विलास बाबा जवळ यांनी दिला.

Post a Comment

0 Comments