Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अंबाबाई मंदिरात नऊ दिवस सीपीआरच्या आरोग्य टीमची सेवा.

 अंबाबाई मंदिरात नऊ दिवस सीपीआरच्या आरोग्य टीमची सेवा.

 नवरात्रोत्सवात लाखो भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात. दर्शनाला येणाऱ्या भाविकांना आरोग्याची समस्या उद्भवल्यास तेथे सीपीआरची आरोग्य टीम तयार असते. ही टीम भाविकांवर प्राथमिक आरोग्य उपचार करून त्यांना औषध तसेच गोळ्या देत असतात. आरोग्याची काळजी घेण्यासाठी सीपीआर च्या प्रशासनाने यावर्षी उत्तम नियोजन केले होते. अनेक भाविक भक्तांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून उत्तम मार्गदर्शनही केले. त्यामुळे या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. रुग्णांना अस्वस्थ वाटल्यास ते या आरोग्य टीमला भेट देत होते. त्यानंतर आरोग्य टीम रुग्णांची ताप, थंडी, बीपी, शुगर इत्यादी तपासून त्यांच्यावर औषध उपचार करीत होते. या टीममध्ये कोल्हापूर शहरातील इतर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सुद्धा सहभाग दर्शवला.त्यामुळे या टीमचे भाविकांमध्ये कौतुक होताना दिसले. गेले नऊ दिवस त्यांनी हा उपक्रम राबवून भाविक भक्तांच्या आरोग्याची काळजी घेतली. अशी माहिती सीपीआरचे आरोग्यदूत बंटी सावंत यांनी 

फ्रंट लाईन न्यूज माहाराष्ट् या राष्ट्रीय युट्यूब व पोर्टल चॅनेल च्या  प्रतिनिधीशी बोलताना दिली .


 चौकट...आरोग्य दूताचे कौतुक 


सीपीआरच्या वैद्यकीय टीममध्ये बंटी सावंत हे नेहमीच रुग्णसेवेसाठी तत्पर असतात. सीपीआरमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण तसेच नातेवाईकांच्या अडचणी जाणून त्या  लक्षपूर्वक सोडवण्यासाठी 'बंटी' आरोग्य दूत म्हणून धावून येतात. सीपीआरमध्ये ते आरोग्य दूत म्हणून प्रसिद्ध आहेत. अत्यंत आनंदाने आणि स्वखुशीने ते रुग्णसेवेसाठी सतत प्रयत्नशील असतात. वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना भेटून रुग्णांच्या समस्या सोडवतात. माजी आरोग्य मंत्री  स्व.दिग्विजय खानविलकर यांच्या तालमीत तयार झालेले बंटी अनेक वर्षांपासून साहेबांचा विचार आणि कार्य पुढे नेत आहेत, असे कौतुकाने रुग्ण सांगत असतात.

Post a Comment

0 Comments