Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विश्वाच्या कल्याणासाठी श्री क्षेत्र वडमाऊली देवी मंदिर येथे भक्ती आराधना सामाजिक उपक्रमाचे आयोजन. डॉ. आर डी ढाकणे.

 विश्वाच्या कल्याणासाठी श्री क्षेत्र वडमाऊली देवी मंदिर येथे भक्ती आराधना सामाजिक उपक्रमाचे आयोजन. डॉ. आर डी ढाकणे.

----------------------------------------
बीड:प्रतिनिधी

--------------------------------------

गेल्या अनेक वर्षापासून राज्यांमध्ये सर्वसामान्य माणूस चिंतेत सापडला आहे. तरी सर्वांची चिंता दूर व्हावी यासाठी विश्वशांती व विश्वाच्या कल्याणासाठी श्री क्षेत्र वडमाऊली देवी चे मंदिर येथील भक्ती आराधना सामाजिक उपक्रमाचे उद्दिष्ट सध्याच्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये विविध प्रकारच्या समस्या पहावयास मिळत आहेत. त्यामुळे प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या असो. की दुष्काळी परिस्थिती. विभक्त कुटुंबपद्धती गुन्हेगाराचे वाढते प्रमाण. तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता. कुटुंबिक हिंसा वाढते प्रमाण. सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त जीवन जगत आहे. याच पार्श्वभूमीवर समाजातील सर्वसामान्य नागरिकांना आत्मिक दिलासा मिळावा. त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती व समृद्धी प्रस्थापित व्हावी. त्याचबरोबर संपूर्ण विश्वामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून श्री क्षेत्र दहिफळ वडमाऊली देवी मंदिर येथील भक्ती आराधना कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सामाजिक उपक्रमाचे आयोजन शनिवार दि.28/10/2023 रोजी सकाळी 11 ते एक या वेळेमध्ये करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून श्रीक्षेत्र वडमाऊली देवीच्या मंदिरामध्ये सांस्कृतिक गीताचा कार्यक्रम व शेवटी महाआरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान डॉ.आर डी ढाकणे  श्रीकांत गदळे यांनी केले आहे.असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे....

Post a Comment

0 Comments