मुरगूड - निढोरी रस्त्यावरील स्मशानभूमीची स्वच्छता व दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन.

 मुरगूड - निढोरी रस्त्यावरील स्मशानभूमीची स्वच्छता व दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन नागरिकांचा पालिकेस इशारा.

----------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------

          मुरगूड - निढोरी रस्त्यावरील म्हारकीच्या पुलाजवळ असलेल्या स्मशानभूमीची स्वच्छता व दुरुस्ती एका महिन्यात  न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरपालिकेस निवेदनाद्वारा मुरगूड मधील नागरीकांनी दिला आहे .

           मुरगूड नगरपरिषदेस नुकतीच १०० वर्ष पूर्ण झालेली आहेत. मुरगूडची लोकसंख्या सुमारे १२ हजारांच्या आसपास आहे. मुरगूडची लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता दत्त मंदिराकडे एक स्मशानभूमी आहे. तर दुसरी मुरगूड - निढोरी रस्त्यावर म्हारकीच्या पुलाजवळ आहे. गावभागात मयत झालेल्या व्यक्तीला अंत्यविधी साठी दत्त मंदिराकडील स्मशानभूमीत स्टँडकडे नेले जाते . त्याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

            एस. टी. स्टँड पासून नाका नं. १ पर्यंत मयत व्यक्तिला निढोरी मागावरील स्मशानभूमीत नेले जाते. मात्र त्या स्मशानभूमीत कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. फरशा फुटलेल्या आहेत, सभोवताली गवताचे साम्राज्य पसरले आहे, कचऱ्याचे ढिग पडलेले आहेत. वीजेचा तर पत्ताच नाही . अंत्यविधीला आलेल्या लोकांना उभे राहण्यासाठी जागा नाही. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नंबर मिळविलेल्या मुरगूड नगरपरिषदेस स्मशानभूमीची दुरावस्था दिसत नाही का? असा सवाल नागरीकातून व्यक्त होत आहे. तरी एका महिन्यात या स्मशानभूमीची डागडूजी व स्वच्छता न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देणारे निवेदन  मुरगूड मधील नागरीकांनी पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संदीप घार्गे यांना दिले आहे .

           निवेदनावर सुमारे दोनशे हुन अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यामध्ये लक्ष्मण पाटील ,सर्जेराव पाटील,सुधीर खाडे ,प्रशांत बुडवे, सुखदेव  येरुडकर, सौ . सुप्रिया भाट ,जयसिंग भोसले , सुहास खराडे,एकनाथ मांगोरे ,किशोर पोतदार , किरण  गवाणकर, बाजीराव पाटील , दीपक शिंदे , विकी साळोखे  , अश्विन मंडलिक, सागर सापळे, सोमनाथ यरनाळकर ,प्रभाकर वंडकर , गजानन पाटील ,नामदेव शिंदे आदी उपस्थित होते . 

मुरगूड : स्मशानभूमी दुरुस्तीचे निवेदन मुख्याधिकारी संदीप घार्गे यांना देताना एकनाथ मांगोरे ,सुधीर खाडे ,किरण  गवाणकर, बाजीराव पाटील व अन्य.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.