गांधीनगर मेनरोडवरील नित्याच्या वाहतुकीच्या कोंडीवर उपाय करा करवीर शिवसेनेची मागणी.
गांधीनगर मेनरोडवरील नित्याच्या वाहतुकीच्या कोंडीवर उपाय करा करवीर शिवसेनेची मागणी.
---------------------------------------------------------------------
गांधीनगर :
गांधीनगर बाजारपेठेतील मेनरोडवर होणारी नित्याची वाहतुकीची कोंडी कायमची डोकेदुखी ठरली असून त्यावर वेळीच उपाययोजना करा, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांच्याकडे करण्यात आली.#
करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की किमान दिवाळीच्या तोंडावर तरी वाहतुकीच्या कोंडीवर उपाययोजना करा. वाहतूक संस्थांना जरी वेळ ठरवून दिली असली तरी या वेळेच्या अटीचा काही जणांकडून भंग होत आहे. अशांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.
दिवाळी सणाला वीट भट्टी परिसरात चार चाकी वाहनांना आत मध्ये प्रवेश बंदी असते, त्यामुळे ग्राहक त्याच परिसरात आपली खरेदी करून जातो, त्यामुळे रस्ता मोठा होऊनही बस स्टॉप जवळील सर्वच मार्केटमधील दुकानांमध्ये ग्राहक खरेदीसाठी जात नाही, त्या परिसरातील दुकानांनाही मोठ्या रकमेचे भाडे असून ग्राहक खरेदीसाठी येत नसल्याने त्यांना सणासुदीला आर्थिक फटका बसतो, रस्ता लहान असूनही पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी योग्य व चांगले दिवाळी सणाला वाहतुकीचे नियोजन केले होते. बस स्टॉप परिसरातील दुकानांमध्ये खरेदीला जाणाऱ्या वाहनांसाठी रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंगची व्यवस्था करावी. त्यामुळे त्या भागातीलही दुकानांमध्ये ग्राहक खरेदीला जाऊ शकतो. स्पॉट ठरवून वाहतुकीचे नियोजन करायला हवे. रस्ता आता मोठा झाला आहे. त्यामुळे ग्राहकांनाही पसंतीच्या दुकानांमध्ये खरेदी करता येईल. याबाबत नियोजन करावे, असे शिवसैनिकांनी पोलिसांकडे मागणी केली.
सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील यांना याबाबतचे मागणीचे निवेदन देण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक, गांधीनगर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले. व्यापाऱ्यांसह ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत नियोजन करू, असे घोडे पाटील यांनी स्पष्ट केले. या शिष्टमंडळात संतोष चौगुले, विभागप्रमुख विरेंद्र भोपळे, हिंदुत्ववादी शरद माळी, शाखाप्रमुख दिपक अंकल, फेरीवाले संघटनेचे बाळासाहेब नलवडे, ग्राहक सेनेचे संजय काळुगडे, ग्राहकसेनेचे तालुकाप्रमुख जितू कुबडे, विभागप्रमुख दिपक पोपटाणी, गांधीनगर उपप्रमुख दिपक धिंग, किशोर कामरा, अजित चव्हाण, शिवाजी लोहार, नवाज जमादार, आबा जाधव, किरण मुळके, जितू चावला, रिटेल व्यापारी अध्यक्ष दिलीप कुकरेजा, शंकर गजवानी, सुनील बदलानी, जय ठहकारानी, सुनिल लालवानी आदी पदाधिकारी व शिवसैनिक आणि व्यापारी उपस्थित होते.#
....फोटो ओळी....#
गांधीनगर बाजारपेठेतील वाहतुकीच्या कोंडीबाबत उपाययोजना करा, या मागणीबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांच्याशी चर्चा करताना शिवसैनिक व व्यापारी.
Comments
Post a Comment