Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सीपीआर मध्ये कर्मचारी व डॉक्टर यांचा तुटवडा!

  सीपीआर मध्ये कर्मचारी व डॉक्टर यांचा तुटवडा!

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री लक्ष देणार का?रिक्त पदे भरणार का ?

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री लक्ष देणार का?रिक्त पदे भरणार का ?

पश्चिम महाराष्ट्र मधील गोरगरिबांचा थोरला दवाखाना अर्थात छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल.

या दवाखान्यात संपुर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील कोंकण पट्ट्यातील कोल्हापूर जिल्हयाबाहेरील गोरगरीब रुग्ण कमी खर्चात चांगलं उपचार मिळतात म्हणून cpr मध्ये उपचार घेण्यासाठी येत असतात व येतात  परंतु केस पेपर  रुग्णांना देण्यासाठी रुग्णालयातील  ॲम्बुलन्स मधील ड्रायव्हर यांची नियुक्ती केली आहे का?केस पेपर मिळेपर्यंत डॉक्टर ओपीडी मधून निघून गेलेले असतात मग त्या रुग्णांनी काय करायचं  त्यांनी परत आलेल्या गावाकडे परत जाऊन परत यायचे का?

याही गोष्टीवर आरोग्य मंत्र्यांनी विचार करावा व  लक्ष घालावे

रोज या रुग्णालयात हजारोंच्या संख्येने उपचारासाठी रुग्ण येत असतात.

शंभर रुग्णांच्या पाठीमागे एक डॉक्टर अशी परिस्थिती आता सध्या या रुग्णालयात पाहावयास मिळत आहे 

 हि बाब गंभीर असून महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री लक्ष देणार का ?

जिथं रुग्णांच्या वर उपचार केले जातात तेथील संडास बाथरूम यांची परिस्थिती अत्यंत दुर्गंधी येत असून त्या ठिकाणी उपचार घेणारा पेशंटची मुस्कटदाबी (रुग्णालयामधील संडास बाथरूमची स्वच्छता नीट होत नसल्यामुळे तिथे दुर्गंधीचे साम्राज्य आढळते) रस्त्यावर दवाखान्यातील सांडपाणी मलयुक्त ड्रेनेजचे पाणी सर्व दवाखान्यांमध्ये असणाऱ्या रस्त्यावरून वाहत असल्याचा प्रकार या दवाखान्यात होत आहे

याकडे सार्वांजनीक बांधकाम विभाग लक्ष देणार का?

परगावच्या उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना  या cpr मध्ये अमानुषपणे वागणूक मिळत आहे. कारण सी पी आर मधील अपुरे डॉक्टर व अपुरा कर्मचारी वर्ग तरी रुग्णांच्या वर चांगले उपचार वेळच्या वेळी व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून डॉक्टर व कर्मचारी वर्ग तातडीने भरावा व रूग्णांची हेळसांड थांबवावी अशी आर्त हाक  cpr  मध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केली

Post a Comment

0 Comments