Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आधारभूत ग्राम उपकेंद्र डॉक्टराच्या प्रतीक्षेत.

 आधारभूत ग्राम उपकेंद्र डॉक्टराच्या प्रतीक्षेत.

-------------------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मेढा प्रतिनिधी - प्रमोद पंडीत
भणंग ता जावळी 
-----------------------------------------------------
सातारा येथील पशु वैद्यकीय दवाखाना लाखो रुपये खर्च करून महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीलापुरक व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पशु पालन , या व्यवसायातील जनावऱ्याची व्यवस्था व निगा आणि देखभाल पाहण्यासाठी आधारभूत ग्रामीण उपकेंद्राची स्थापना केली लाखो रुपये खर्ची करून पशुवैद्यकीय दवाखाना व डॉक्टर निवास उभारण्यात आले काही वर्षे दवाखाना व्यवस्थित चालू होता त्यामुळे रिटकवली, ओझरे , भणंग , केसकरवाडी , केजळ , मोरावळे , खामकरवाडी , आणि चिंचणी असे आठ - दहा गावाच्या शेतकऱ्यांना उपयुक्त असा आधारभूत ग्राम उपकेंद्राचा उपयोग होत होता दररोज २० ते २५ जनावरे दवाखान्यात येत असत २० ते २५ जनावारांंची तपासणी होत असे त्यामुळे पशुची निगा व उपचार वेळेच्या वेळी मिळत असल्यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी होत गेले होते त्यामुळे शेतकऱ्याचा दुध दुपती जनावरे पाळण्याकडे कल वाढत गेला . दिवसाला ५० एक जनावरे दवाखान्यात उपचार घेऊ लागली

परंतु ह्या चार पाच वर्षांत दवाखान्यात डॉक्टर दिसणे बंद झाले डॉक्टर आहेत का डॉक्टर असे म्हणण्याची वेळ आली .त्यामुळे शेतकऱ्यांना आपली जनावरे घेवून तासनतास डॉक्टराची वाट पाहात बसावे लागत आहे आता तर एक - एक - दोन - दोन आठवडे डॉक्टर दवाखान्याकडे फिरकत नाहीत मग खाजगी डॉक्टरांकडे शेतकरी जाऊ लागले त्या डॉक्टरांची फी मुळे शेतकऱ्याचे खिसे मोकळे होत असे दवाखान्याचा खर्च परवडत नसल्यामुळे जनावरे कमी होऊ लागली आणि डॉक्टर वेळेत मिळत नसल्यामुळे जनावरे दगावण्याची प्रमाणात वाढ होत आहे जनावरे पाळणे अवघड होत गेले जनावरे पाळणे न परवडणारे झाले शेतकरी पशु पालना पासून दुर जाऊ लागले . शेती व्यवसाय परवडणे सारखे होऊ लागली शेती व दुध दुपत्याचा व्यवसाय वाचवण्यासाठी आधारभूत केंद्रात डॉक्टरांची नेमणूक करून आधारभूत केंद्राची या संकटातून सुटका करावी अशी मागणी भणंग व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या कडून होत आहे नाही तर उपकेंद्राला टाळे लावण्यात येतील अशी तिखट प्रतिक्रिया ग्रामस्था कडून होत आहे तरी संबधीत अधिकार्यानी लक्ष घालून आधारभूत ग्राम उपकेंद्र भणंग येथे डॉक्टरांची नेमणूक करावी

Post a Comment

0 Comments