Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

चंदगड बेळगांव दुर्गवीरांच्या प्रयत्नाने कलानिधीगडावरील दुर्लक्षित झालेल्या 2 पाण्याची टाक्या उजेडात.

 चंदगड बेळगांव दुर्गवीरांच्या प्रयत्नाने कलानिधीगडावरील दुर्लक्षित झालेल्या 2 पाण्याची टाक्या उजेडात.

-----------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

चंदगड प्रतिनिधि

अमृत गावडे 

----------------------------------

 चंदगड :- कलानिधीगडावर गेली अनेक वर्षे ज्या पाण्याच्या टाक्याने वाटसरूंची,मावळ्यांची तहान भागवली असेल, अशा दोन पाण्याच्या टाक्या गडाच्या गणेश दरवाजाच्या खालच्या बाजूच्या जंगलात दुर्गवीरांना कलानिधी गडावर आढळून आल्या. रविवारी झालेल्या मोहिमेत दुर्गवीरांनी गर्द जंगलात उतरून त्या टाक्यांची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम पार पाडली. त्या पाण्याच्या टाक्या गडावर आलेल्या शिवभक्तांना पाहता यावीत या उद्देशाने त्या टाक्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुद्धा बनवण्याचे काम सुरू आहे टाकी नं 1- हि आकाराने मोठं असून इथे समाधी पादुका दुर्ग विराच्या निदर्शनास आल्या.

टाक नं 2- ह्या टाकीचा आकार लहान असून यामध्ये सुंदर गणेशाचे शिल्प कोरलेलं दुर्ग विराना आढळले.

पुढील काही दिवसातच त्या टाक्यामधील दगड माती बाहेर काढून ते शिवभक्तांना पाहण्यासाठी लवकरच खुल होईल.. 26/11 मुंबई हल्ल्यातील पोलीस बांधवांना आदरांजली वाहण्यासाठी या श्रमदान मोहीम राबविण्यात आली होती.. त्या शहिदांना स्मरून ही मोहीम यशस्वी पार पडली.


आपणासही ते पाण्याचं टाक पाहायचं असतील आणि त्याच्या संवर्धनासाठी काम करायचं असेल तर दुर्ग विर प्रतिष्ठान चंदगड बेळगाव सीमा भागाच्या वतीने करण्यात आले आहे.

नक्की संपर्क करा.

9870101231- चंदगड

9740103131- बेळगाव


धन्यवाद

दुर्गवीर प्रतिष्ठान

चंदगड-बेळगाव सीमाभाग

Post a Comment

0 Comments