Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विद्या मंदिर हलसवडेच्या मुख्याध्यापिका शशिकला पाटील ( शोभाबाई ) या 38 वर्ष प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त.

विद्या मंदिर हलसवडेच्या मुख्याध्यापिका शशिकला पाटील ( शोभाबाई ) या 38 वर्ष प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त.

-----------------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

सांगवडे प्रतिनिधी 

 विजय कांबळे

-----------------------------------------------

सांगवडे प्रतिनिधी ता. 29हलसवडे येथील

विद्या मंदिर हलसवडेच्या मुख्याध्यापिका शशिकला पाटील ( शोभाबाई ) या 38 वर्ष प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्या.

   सेवानिवृत्त सदिच्छा समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलताना, निवृत्त शिक्षण सहसंचालक व्ही.बी. पायमल म्हणाले, आज लोकार्थाने त्या निवृत्त झाल्या मात्र त्यांच्या कार्याचा दरवळ कस्तुरी सारखा कायम दरवळत राहणार आहे. ते पुढे म्हणाले, कर्तुत्वान स्त्रीच्या पाठीमागे पती आहेत त्यांच्या प्रेरणेने प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्यांना चांगलं घडविणाऱ्या शोभाबाई विद्यार्थ्यांच्या मनात राहिल्या आहेत. जिद्द, चिकाटी, हिम्मत असेल तरच चांगले विद्यार्थी शिक्षक घडवू शकतात शोभाबाईंनी 38 वर्षात अनेक विद्यार्थी घडवले त्याचे हे फलित आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी पं.स करवीर समरजीत पाटील होते. त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समरजीत पाटील म्हणाले, कोणतेही नियोजन पक्के नीटनेटके असलं की, यशाचे उत्तम शिखर सर करता येते त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे शोभाबाई पाटील होत.

यावेळी ग्रामपंचायत व विद्या मंदिर हलसवडे चे सर्व शिक्षक वृंद यांच्यामार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांना शिकवणारे शिक्षक म्हणजे त्यांचे गुरु आनंदराव जाधव गुरुजी, जे.डी. पाटील उपस्थित होते. पती जे. ए.पाटील, नातू ओम पाटील श्री राजूगडे, रमेश जाधव शाळेतील विद्यार्थिनी मृणाली कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

    सदिच्छा कार्यक्रमास शिक्षण क्षेत्रातील तसेच राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्र मैत्रिणी, नातेवाईक आजी माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते. तसेच माजी जि.प. सदस्या वंदना पाटील, करवीर पंचायतीच्या माजी सभापती मंगल पाटील, करवीर पंचायत समितीच्या माजी सदस्या शोभा राजमाने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments