Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

चिंचवाड ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्षांची बाजी: श्रद्धा पोतदार लोकनियुक्त सरपंच.

 चिंचवाड ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्षांची बाजी: श्रद्धा पोतदार लोकनियुक्त सरपंच.

गांधीनगर:- चिंचवाड ता करवीर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत अपक्षांनी बाजी मारली आहे. स्थानिक संयुक्त ग्रामविकास आघाडी विरुद्ध अपक्षांच्या शर्तीच्या लढतीत तब्बल आठ अपक्ष सदस्य म्हणून निवडून आले आहेत.  संयुक्त आघाडीला केवळ चार जागेवर समाधान मानावे लागले. तर थेट जनतेतून लोकनियुक्त सरपंच म्हणून श्रद्धा प्रशांत पोतदार यांनी बाजी मारली.

ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी चार उमेदवार  तर सदस्य पदासाठी 30 उमेदवार रिंगणात होते. आ.सतेज पाटील आणि महाडिक गटाच्या संयुक्त ग्रामविकास आघाडीच्या एक महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या होत्या. रविवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत 85 टक्के मतदान झाले.

विजय झालेले उमेदवार त्यांना पडलेली मते कंसात 

लोकनियुक्त सरपंच विजयी उमेदवार श्रद्धा प्रशांत पोतदार (1019),

सदस्य पदी विजयी उमेदवार

प्रभाग 1 ) मेघा अशोक पाटील (बिनविरोध)

स्वाती आनंदराव आंबी (432), राहुल कुमार पाटील (458)

प्रभाग क्रं .2) सरस्वती बाबुराव बिराजदार,(374)

प्रभाग क्र.3) सिद्धोजीराव गणपतराव रणनवरे (430), कविता कुलदीप कांबळे (392),

प्रभाग क्रं.4) सचिन महादेव जाधव (292), रोहिणी सुदर्शन उपाध्ये (378),

प्रभाग क्रं.5) निखिल सांवता पोवार (370), स्वाती आनंदराव आंबी (376), चैताली महावीर पाटील (392),

दरम्यान या निवडणुकीत अपक्षांनी बाजी मारली असली तरी उपसरपंच पदासाठी रशीखेच  होणार आहे. विजय उमेदवार आणि गावातून गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

फोटो लोकनियुक्त सरपंच श्रद्धा प्रशांत पोतदार

Post a Comment

0 Comments