Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचा सातवा भव्य वर्धापन दिन सोहळा.

अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचा सातवा भव्य वर्धापन दिन सोहळा.

----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

पन्हाळा प्रतिनिधी

आशिष पाटील 

----------------------------------------

कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा येथे बुधवारी दि.२९ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजन.

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन : डॉक्टर्सना विविध पुरस्काराचे वितरण

वाशिम - राज्यभरातील ग्रामीण डॉक्टरांना एकीच्या झेंड्याखाली आणून त्याच्या न्यायहक्कासाठी व्यवस्थेशी सतत संघर्ष करुन ग्रामीण क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्राला संरक्षण, सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त करुन देणार्‍या अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनच्या सातवा वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन संस्थापक अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांच्या पुढाकारातून येत्या बुधवार, २९ नोव्हेंबर रोजी एैतिहासीक नगरी कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा येथे करण्यात आले आहे

पन्हाळा येथील बसस्थानकाच्या पाठीमागील न.प. सांस्कृतीक भवनात सकाळी ११ वाजता होणार्‍या या वर्धापन दिन कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. रुपालीताई धडेल ह्या करतील तर अध्यक्षस्थान महाराष्ट्र काऊंन्सिल ऑफ अ‍ॅक्युपंक्चरचे प्रबंधक नारायण नवले हे भुषवितील. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विधिज्ञ अ‍ॅड. स्वप्नील वानखेडे, उपनगराध्यक्ष चेतन भोसले, निसर्गोपचार तज्ञ डॉ. सौ. स्नेहल जाधव, प्रमुख मार्गदर्शक म्हणून मधुमेह तज्ञ डॉ. अमित असळकर, ग्लोबल अप्टोमेट्री असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ बोराटे, प्रमुख अतिथी म्हणून अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे, महिला राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. टिना राठोड, राष्ट्रीय सचिव डॉ. रमेश लबडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष गायकवाड, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रकाश माळी, महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. शब्बीर शेख, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा डॉ. सौ. मनिषा सिरसाट, प्रसिध्दी प्रमुख डॉ. सुभाष सिरसाट, महिला सचिव डॉ. श्यामा कांबळे, प्रदेश सहसचिव डॉ. संदीप राठोड, प्रदेश युवा अध्यक्ष डॉ. गजानन बाजड, प्रदेश युवा सचिव डॉ. प्रकाश मलीक यांची उपस्थिती राहील. या कार्यक्रमात ग्रामीण आणि दुर्गम भागात उत्कृष्ट सेवा देणार्‍या ग्रामीण डॉक्टरांचा विशेष सेवा पुरस्काराने गौरव करण्यात येईल. ऐतिहासिक कोल्हापूर जिल्हयात पार पडणार्‍या या नेत्रदिपक कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हयातील राजकीय, सामाजीक, सांस्कृतीक व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शन  लाभ घेता येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांच्या मार्गदर्शनात कोल्हापूर जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी व सदस्य अथक परिश्रम घेत आहेत. तरी या भव्य कार्यक्रमाला राज्यभरातील अल्टरनेटीव्ह मेडीसीन, नॅचरोपॅथी, इलेक्ट्रो होमीयोपॅथी, अ‍ॅक्युप्रेशर, अ‍ॅक्युपंचर, बायोकेमीक, आर्युवेद, हर्बल, नाडी परिक्षण यासह इतर ग्रामीण व शहरी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. माधव हिवाळे यांच्यासह आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, उपाध्यक्ष डॉ. सागर बेलेकर, सचिव डॉ. बलराम गंथडे, कोषाध्यक्ष डॉ. चंद्रकांत कोथळे, प्रसिध्दीप्रमुख डॉ. इंद्रजीत जाधव, सदस्य डॉ. प्रशांत निर्मळे, डॉ. मनोज ऐलापुरे, डॉ. विठ्ठल शिंगाडे, डॉ. संदीप एैवाळे, महिला प्रतिनिधी डॉ. स्मीता मोरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments