Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचा सातवा वर्धापन दिन सोहळा दिमाखदार आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न.

अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचा सातवा वर्धापन दिन सोहळा दिमाखदार आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

पन्हाळा प्रतिनिधी

 आशिष पाटील

-------------------------------------

     राज्यभरातील ग्रामीण डॉक्टरांना एकीच्या झेंड्याखाली आणून त्याच्या न्यायहक्कासाठी व्यवस्थेशी सतत संघर्ष करुन ग्रामीण क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्राला संरक्षण, सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त करुन देणाऱ्या अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनच्या सातवा वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन संस्थापक अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे सर यांच्या पुढाकारातून बुधवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ रोजी ऎतिहासीक नगरी कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा पर्यटन ठिकाणी ग्रामीण व शहरी वैद्यकीय क्षेत्रातील २०० हून अधिक डॉक्टर्स बांधवांच्या उपस्थितीमध्ये दिमाखदार आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


    पन्हाळा येथील बसस्थानकाच्या पाठीमागील न.प. सांस्कृतीक भवनात सकाळी १२ वाजता या वर्धापन दिन कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ.रुपालीताई धडेल ह्यानी केले तर,अध्यक्षस्थान महाराष्ट्र काऊंन्सिल ऑफ अॅक्युपंक्चरचे प्रबंधक नारायण नवले ह्यांनी भुषविले.कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विधिज्ञ अॅड.स्वप्नील वानखेडे, उपनगराध्यक्ष चेतन भोसले, निसर्गोपचार तज्ञ डॉ. सौ. स्नेहल जाधव,प्रमुख मार्गदर्शक म्हणून मधुमेह तज्ञ डॉ.अमित असळकर,ग्लोबल अप्टोमेट्री असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ बोराटे, प्रमुख अतिथी म्हणून अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे, महिला राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. टिना राठोड, राष्ट्रीय सचिव डॉ. रमेश लबडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष गायकवाड, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रकाश माळी, महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. शब्बीर शेख, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा डॉ. सौ. मनिषा सिरसाट, प्रसिध्दी प्रमुख डॉ. सुभाष सिरसाट, महिला सचिव डॉ. श्यामा कांबळे, प्रदेश सहसचिव डॉ. संदीप राठोड, प्रदेश युवा अध्यक्ष डॉ. गजानन बाजड, प्रदेश युवा सचिव डॉ. प्रकाश मलीक यांची उपस्थिती होती.


     या कार्यक्रमात ग्रामीण आणि दुर्गम भागात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या मेडीसीन, नॅचरोपॅथी, इलेक्ट्रो होमीयोपॅथी, अॅक्युपंचर, अॅक्युप्रेशर, बायोकेमीकल, आर्युवेद, हर्बल, नाडी परिक्षण यासह इतर ग्रामीण व शहरी वैद्यकीय क्षेत्रातील ५० हून अधिक डॉक्टर्स बांधवांचा विशेष वैद्यकीय पुरस्काराने गौरव करण्यात आला. मोमेंटो,प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.


      महाराष्ट्र काऊंन्सिल ऑफ अॅक्युपंक्चरचे प्रबंधक नारायण नवले साहेब ह्यांनी या अॅक्युपंक्चर पॅथीचा प्रचार-प्रसार होण्यासाठी आणि अधिक- अधिक वापर होण्यासाठी आवाहन केले. तर,असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे सर यांनी संघटनेची सुरुवाती पासून आज अखेर यशस्वी वाटचालीबाबत सांगितले शेवटी त्यांनी आलेल्या सर्वाचे धन्यवाद मानून आभार व्यक्त केले.

      कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले. यामध्ये आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, उपाध्यक्ष डॉ. सागर बेलेकर, सचिव डॉ. बलराम गंथडे, कोषाध्यक्ष डॉ. चंद्रकांत कोथळे, प्रसिध्दीप्रमुख डॉ. इंद्रजीत जाधव, सदस्य डॉ. प्रशांत निर्मळे,डॉ प्रदीपकुमार शिंदे सर, डॉ. मनोज ऐनापुरे, डॉ. विठ्ठल शिंगाडे, डॉ. संदीप रैवाळे, महिला प्रतिनिधी डॉ. स्मीता मोरे य सर्वाचे मोलाचे योगदान आहे.

Post a Comment

0 Comments