Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आम्ही अक्षर दुनियात रमतो - प्रशांत लिगाडे.

 आम्ही अक्षर दुनियात रमतो - प्रशांत लिगाडे.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

मेढा  प्रतिनिधी 

 प्रमोद पंडीत 

-------------------------------------

 🪔 संपूर्ण महराष्ट्रातील पहिला अभिनव उपक्रम. 🪔

पुष्प दुसरे

🪔 *पहाटेची भूपाळी कवितांची दिवाळी* 🪔

 जावली तालुका साहित्यप्रेमी 

आम्ही अक्षर दुनियेत रमतो

चोरांबे (मेढा) दिनांक १५/११/२०२३ जावली तालुका साहित्यप्रेमी, पद्मावती देवस्थान ट्रस्ट, सरपंच व ग्रामस्थ चोरांबे यांच्या वतीने दिवाळी पहाट 


पुष्प दुसरे पहाटेची भूपाळी कवितांची दिवाळी हा महाराष्ट्रातील पहिला अभिनव उपक्रम पहाटे ०५.३० वाजता चोरांबे येथे सुरू केला. चोरांबे गावाचे तसेच मेढा भागातील ६० गावांचे आराध्य दैवत आई पद्मावती देवीचे मंदिर आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. दुसर पुष्प आपल्या पद्मावती आईच्या चरणी अर्पण केले त्यामुळे आईचा आशीर्वाद प्राप्त झाला. चोरांबे गाव हे मेढा भागातील स्वच्छ व सुंदर गावं म्हणून ओळखले जाते.तेथील मा सरपंच विजय सपकाळ व चोरांबे ग्रामस्थ आपल्या गावाच्या विकासासाठी धडपडत असतात. सर्व चोरांबे ग्रामस्थ एकजुटीने मेहनतीने गावाच्या अडी अडचणीनची सोडवणूक करत असतात. *जावली तालुका साहित्यप्रेमी संघ* यांनी सुरू केलेल्या अभिनव चळवळीला साथ द्यायची म्हणून व जावली तालुक्यातील कवी व लेखक यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून चालू असलेल्या उपक्रमास हातभार म्हणून आज दुसरा कार्यक्रम त्यांनी आपल्या चोरांबे गावात घेतला त्यावेळी बरेच ग्रामस्थ हजर होते. त्यांनी कार्यक्रमाला भरपूर दाद दिली 

                  सगळीकडे दिवाळी पहाट हा कार्यक्रम सुरेल अश्या संगीत मैफिलेने सुरुवात होते. पण या वर्षी याला छेद देत दिवाळी पहाट हा कार्यक्रम कवितांच्या मैफिलीने कुसुंबी बरोबर चोरांबे येथे पार पडला


    या प्रसंगी पहिल्यांदा ,पद्मावती देवस्थान ट्रस्ट,चोरांबे ग्रामस्थ , माननीय सरपंच विजय सपकाळ, जावली तालुका साहित्यप्रेमी यांच्या वतीने दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. भारदस्त आवाज असलेले श्री श्रीकांत चिकने यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या वेळी मंचकावर सौ. जयश्री माजगावकर मेढा,नंदासुत प्रशांत रतिकांत लिंगडे मेढा, श्री दत्ता जाधव भणंग, कु.शुभम लोखंडे, केडाबे ,कू आरती दळवी, नांदागणे, श्री नवनाथ दळवी, म्हाते यांनी उत्तम अश्या कवितांचे सादरी करणं केले. त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळाला. पहिलाच कार्यक्रम यशस्वी पार पडल्या नंतर दुसरा उपक्रम चोरांबे येथे झाला व त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे कार्यक्रमाला उत्तम यश मिळाल्याचे दिसून आले. नवीन कवींना एक हक्काचे व्यासपीठ यामुळे नक्कीच येथून पुढे मिळणार हे पक्के झाले आहे. जावली तालुका साहित्यप्रेमी यांच्या वतीने हा अभिनव उपक्रम

महाराष्ट्रात पहिल्यांदाच जावली तालुक्यात होत आहे. जावली पॅटर्न पाठोपाठ *पहाटेची भूपाळी कवितांची दिवाळी* हा अभिनव उपक्रम महाराष्ट्रात पहिल्यांदाच जावली तालुक्यात होत आहे. एक नवीन उपक्रम म्हणून या कडे पाहिले जात आहे. आज कालच्या मोबाईल च्या जमान्यात मोबाईल सोडून मराठी भाषेला वाचवण्यासाठी एकत्र येवून *जावली साहित्य प्रेमी* यांनी ही चळवळ सुरू करतेय ही एक विशेष बाबा आहे.

Post a Comment

0 Comments