मराठा आरक्षण मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा.
मराठा आरक्षण मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा.
भणंग प्रतिनिधी :- सद्या मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे जोपर्यंत निवडुन दिलेल्या आमदार, खासदार यांच्या निवास स्थाना समोर धरणे आंदोलन होत नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही तेव्हाच ते खडबडून जागे होतील वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर व जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांच्या आदेशानुसार जावली तालुक्यातील उपोषणासाठी बसलेल्या मराठा बंधवास वंचित बहुजन आघाडी जावली तालुक्याचे वतीने आम्ही पाठींबा देत आहोत मराठा बांधव ज्या भुमिका घेतील त्यास आम्ही समर्थन देत आहोत अशा आशयाचे पत्र मेढा येथे उपोषणास बसलेल्या मराठा बांधवांस त्यांनी दिले सदरप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रताप सपकाळ सिदार्थ जगताप आनंदा परिहार योगेश कांबळे मोहन खरात सिताराम कांबळे रमेश गाडे उपस्थीत होते सोबत उपोषणकर्ते सचिन करंजेकर, प्रकाश कदम , बजरंग चौधरी , राम कदम , निलेश चिकणे जितीन वेंदे उपस्थित होते मराठा आरक्षण बाबत पाठींबा दिलेबद्दल सकल मराठा समाज जावली तर्फे त्यांचे आभार मानणेत आले.
Comments
Post a Comment