Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अलोट गर्दी,जोरदार वस्तु पदार्थ विक्री व भरभरून आनंदी क्षण देऊन जय अनंत महोत्सव २०२३ चा समारोप.

 अलोट गर्दी,जोरदार वस्तु पदार्थ विक्री व भरभरून आनंदी क्षण देऊन जय अनंत महोत्सव २०२३ चा समारोप.

------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजित ठाकुर 

------------------------------------------

  सर्वच कलासादरकरणीवर जनतेने व्यक्त केले प्रेम.

  -तब्बल ५३ लक्ष रुपये खाद्य पदार्थ व वस्तूची विक्री.

 रिसोड - ॲड.नकुल देशमुख यांच्या संकल्पनेतून साकार झालेला जय अनंत महोत्सव २०२३ वर्ष ३ रे, उत्सव महाराष्ट्रीयन कला संस्कृतीचा या अंतर्गत रिसोड मालेगाव तालुका व परिसर मधील असंख्य लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या अनुभवाचे क्षण देऊन सदर महोत्सवाचा समारोप झाला.

जय अनंत महोत्सव २०२३ चे यावर्षी तिसरे वर्ष होते उत्सव महाराष्ट्रीयन कला संस्कृतीच्या अंतर्गत यावर्षी शिवकालीन शहरा आणणारे प्रसंग, महाराष्ट्राची संत परंपरा व वारकरी संप्रदाय, महाराष्ट्र व देशातील विविध नृत्यप्रकार, व इतर अनेक कला सादरीकरण, इतिहासकालीन शस्त्र प्रदर्शनी तसेच अनेक दैनंदिन उपयोगाच्या व सर्वांच्या रोजनिशीच्या जीवनातील वस्तू चविष्ट खाद्यपदार्थ यांच्या विक्रीवर आस्वाद घेत या तीन दिवसीय महोत्सव दरम्यान हजारो परिवारांनी असंख्य लोकांनी भेट देत आनंदाचे क्षण अनुभवात या महोत्सवाचा आनंद लुटला. शिस्तबद्ध नियोजन, स्वच्छता, तितक्याच प्रमाणात कला सादरीकरण करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या कलेत भरलेला जोरदार अभिनय यांनी लोकांची मन जिंकली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही प्रसंगाचे अंगावर शहर येणारे सादरीकरण अतिशय उत्कृष्टपणे सादरीकरणामुळे लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासकीय अधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी, गोरगरीब, जनसामान्य, पत्रकार, विविध क्षेत्रातील नावलौकिक असलेले व्यक्तिमत्व यांनी या तीन दिवसीय महोत्सवादरम्यान भेट देऊन ॲड.नकुल दादा देशमुख यांच्या संकल्पनेचे व नियोजनाचे भरभरून कौतुक केले व आपल्या परिवारासहित या महोत्सवाचा मनःपूर्वक आनंद लुटला. यावेळी महोत्सवा दरम्यान अतिशय शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते. ॲड.नकुल देशमुख यांनी प्रत्येक नियोजनावर बारकाईने लक्ष देत हा महोत्सव यशस्वी करून दाखवला मागील दोन वर्षाच्या यशस्वी नियोजन नंतर याही वर्षी हजारोच्या संख्येने अनेक परिवारांनी व नागरिकांनी या महोत्सवाचा आनंद घेतला. सौ.अमृताताई यांनी महोत्सवातील प्रत्येक नियोजनात गुणवत्ता व कला सादरीकरण यशस्वी होण्यासाठी नियोजन केले होते त्यांच्या या नियोजनास सादरीकरणाच्या माध्यमातून लोकांची मन जिंकून यश आले. यावेळी कार्यक्रमादरम्यान माजी मंत्री अनंतराव देशमुख,सौ.जयश्री ताई देशमुख यांच्या मार्गदर्शनात हा महोत्सव पार पडला.प्रत्येक कलाकृती सादरीकरण नाटिकेस व सर्व स्टॉल धारकांना ॲड.नकुल देशमुख यांनी भेट देऊन चौकशी केली.

*तब्बल ५३ लक्ष रुपयांच्या पदार्थ व वस्तू विक्रीची उलाढाल*

शिस्तबद्ध नियोजन काटेकोर व्यवस्था पुरवण्यात आलेल्या सुविधा व असंख्य हजारोंच्या संख्येने येणाऱ्या परिवार व जनतेने घेतलेला मनमुराद आनंद व विविध खाद्यपदार्थ व वस्तू यांचा विक्री तब्बल 53 लक्ष रुपये च्या दरम्यान झाले असून हा महोत्सवा दरम्यान झालेल्या आर्थिक उलाढालीचा विभागातील उच्चांक आहे. ॲड. नकुल देशमुख यांनी स्थानिक बचत गट, समूह, व्यावसायिक ,दुकानदार छोटे व्यवसायिक यांना स्टॉलसाठी प्राधान्य दिले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या विक्रीमुळे व त्याच पद्धतीने या अनंत महोत्सवाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालेल्या प्रचार प्रसारामुळे स्टॉल धारकांनी आनंद व्यक्त करून, ॲड. नकुल देशमुख यांचे संकल्पनेतून साकार झालेल्या या महोत्सवाचे कौतुक करून अतिशय सुंदर अशा नियोजनाबाबत भरभरून कौतुक केले. अशाप्रकारे अलोट गर्दी जोरदार वस्तू व पदार्थ विक्री व हजारोच्या संख्येने येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदी क्षणाचे अनुभव देऊन जय अनंत महोत्सव 2023 चा समारोप झाला.

ॲड.नकुल देशमुख यांचे नियोजन व मार्गदर्शनात दि आर्य शिक्षण संस्था,कृषी महाविद्यालय व ॲड.नकुल दादा देशमुख मित्रमंडळ यांनी महोत्सव यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments