Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भावावर कोयताने हल्ला नवरा बायकोवर गुन्हा दाखल.

 भावावर कोयताने हल्ला नवरा बायकोवर गुन्हा दाखल.

---------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

मेढा प्रतिनिधी

 प्रमोद पंडीत

सरताळे ता जावली जिल्हा सातारा येथे जमीन नावावर करून देण्याच्या मागणीसाठी दत्तात्रय काळे हे आईला मारहाण करत असताना रुपेश काळे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्याच्यावर . डोकयाच्या मागच्या बाजूला व हातावर जोरदार हल्ला केल त्यात मानेवर व हाताच्या बोटावर मार बसून जखम झाली .

सरताळे ता जावली येथील पाण्याच्या टाकी जवळ दत्तात्रय हा आईला मारहाण व शिवीगाळ . दमदाटी करत असताना रुपेश काळे सोडवण्यासाठी गेला असता त्यांची भावजय सुजाता हिने जीवे मारून टाक विषय संपवून टाक असे म्हणत कोयता आणून दतात्रयकडे दिला त्यानंतर दतात्रयने भावाला जीवे मारण्याच्या उदेशाने कोयताने रुपेशच्या डोक्याच्या पाठीमागे व हातावर वार केले त्यामुळे रुपेशच्या हाताच्या बोटाच्या मध्ये जखम झाली

फिर्यादी रुपेश नारायण काळे वय -3 ४ वर्षे रा सरताळे यांनी मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली

घटना स्थळी उप अधीक्षक भालचिम यांनी भेट दिली . तपास सहायक निरीक्षक तासगावकर करत आहेत.

Post a Comment

0 Comments