अवकाळी पावसाने पुन्हा आणलं शेतकऱ्यांना अडचणीत.

 अवकाळी पावसाने पुन्हा आणलं शेतकऱ्यांना अडचणीत.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रीसोड प्रतिनिधी 

रणजित ठाकुर 

------------------------------------

तुर, कापूस, भाजीपाला पिकांना मोठा फटका.वीज पडून एका शेतकऱ्याचा व एका बैलाचा मृत्यु.

26 नोव्हेंबरच्या रात्री वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे तुर कापूस भाजीपाला फळबागासह रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे वीज पडून एक व्यक्ती तर एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या पावसाचा फायदा तर मुळीच नाही नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

        मागील दोन-तीन दिवसापासून वातावरणात मोठा बदल झाला होता शेतकरी अतुरतेने पावसाची वाट पाहत होते काल 26 नोव्हेंबरच्या रात्री तालुक्यासह जिल्ह्यात वादळी वारा व विजेच्या गडगडासह  तुफान जवळपास तीन तास पाऊस पडला तालुक्यात काही ठिकाणी काही प्रमाणात लहान आकाराच्या गारपीट झाल्याची माहिती आहे 27 नोव्हेंबर च्या सकाळच्या नऊ वाजेपर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता वाऱ्याचा वेग खूप मोठ्या प्रमाणात होता तर विजेचा कडकडाट तर कांनठाळया बसेल एवढ्या मोठ्या प्रमाणात होता दोन ते अडीच तास विजांचे अक्षरशः थैमान सुरू होते तालुक्यातील देऊळगाव बंडा येथील शेतकरी प्रकाशराव सरनाईक यांचा शेतात वीज पडून मृत्यू झाला तर जांबआढाव येथील एक बैल विज पडल्यामुळे मरण पावला तीन तास पडत असलेला हा पाऊस संकटा समान  जाणवत होता या पावसामुळे फायदा तर मुळीच झाला नाही नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले आहे तूर व वेचणी ला आलेला कापूस  या पिकांचे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जमीन दोस्त झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे याचबरोबर भाजीपाला फळ पिकांचे तर शेतात प्रमाणापेक्षा जास्त पाणी साचल्यामुळे हरभरा व इतर रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे यावर्षी सुरुवातीपासूनच शेतकरी अस्मानी संकटांचा सामना करीत आहे आवर्षणामुळे सोयाबीनचे पीक हातून गेल्या नंतर शेतकऱ्यांची भिस्त रब्बीतील हरभरा  तूर व कापूस या पिकावर होती परंतु काल झालेल्या अवकाळी पावसामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे हाता तोंडाशी आलेला  घास हिरावला आहे महसूल कृषी विभागाकडून पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केल्या जात आहे  हवामान विभागाकडून अजूनही दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असल्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.व यापुढेही अवकाळी पाऊस चालू राहणार असल्याचे समजल्याने शेतकरी पुन्हा अडचणीचा किती सामना करणार यामुळे शेतकरी पुन्हा चिंतातूर  झाला आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.