Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राजेंद्र धनावडे हे केळघर- मेढा परिसरातील दानशूर व्यक्तीमत्व त्यांनी वडिलांच्या पुण्यस्मरणा दिवशी २ मुलींना दत्तक घेऊन त्यांची शैक्षणिक व कन्यादानापर्यंत ची सर्व जबाबदारी त्यांनी घेतली.

 राजेंद्र धनावडे  हे केळघर- मेढा परिसरातील दानशूर व्यक्तीमत्व त्यांनी वडिलांच्या पुण्यस्मरणा दिवशी २ मुलींना दत्तक घेऊन त्यांची शैक्षणिक व कन्यादानापर्यंत ची सर्व जबाबदारी त्यांनी घेतली. 

भणंग:-    राजेंद्र धनावडे  हे केळघर- मेढा परिसरातील दानशूर व्यक्तीमत्व त्यांनी वडिलांच्या पुण्यस्मरणा दिवशी २ मुलींना दत्तक घेऊन त्यांची शैक्षणिक व कन्यादानापर्यंत ची सर्व जबाबदारी त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून समाजोपयोगी उपक्रम , शैक्षणिक मदत , आरोग्य उपचार  तसेच बोंडारवाडी धरण कृती समितीच्या अनेक उपक्रमांना सढळ हस्ते मदत केली आहे परंतू आजचे त्यांचे योगदान वेगळ्याच प्रकारे जनतेसमोर आले त्यांनी वडिलांच्या पुण्यस्मरणा दिवशी २ मुलींना दत्तक घेऊन त्यांची शैक्षणिक व कन्यादानापर्यंत ची सर्व जबाबदारी आपल्या मित्रांचे सहकार्याने घेतली त्यामुळे त्यांचे वर अभिनंदनाचा     वर्षाव होत आहे .                   दि .६ नोहेंबर रोजी कै . लक्ष्मण कोंडीबा धनावडे यांच्या १३ पुण्यस्मरणार्थ समाजप्रबोधन व्हावे यासाठी केळघर येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्यान कार श्री वसंत हंगेरे सर यांच्या " बाप समजून घेताना " या कार्यक्रमाचे आयोजन केळघरचे युवा उद्योजक राजेंद्र धनावडे व बाजीराव धनावडे यांनी केले होते . यावेळी श्री वसंत हंकारे यांनी युवक , युवती व पालकांना बापाचे महत्व पटवून देताना अक्षरश : रडवले . या कार्यक्रमाचे फलित म्हणून व्याख्यान संपताच काही मुलींनी "बापाचे महत्व " या वर मनोगत व्यक्त ही केली त्यातील वडील हयात नसलेल्या परंतू काबाड कष्ट करून त्यांना शिकवणाऱ्या आईची महतीही आवर्जुन सांगत युवा -युवतींना मार्गदर्शक सल्ला दिला . यावेळी युवा उद्योजक राजेंद्र धनावडे यांनी केळघर येथील कु . सिद्धी नारायण शिर्के या मुलीच्या संपुर्ण शिक्षण व लग्नात कन्यादान होईपर्यंतचा खर्चस्वतः करणार असल्याचे जाहिर केले तर कु . साक्षी वि .पवार आलेवाडी या मुलीच्या शिक्षण व लग्नात कन्यादान करण्यापर्यंत सर्व जबाबदारी  नाशिक येथील त्यांचे मित्र डॉ . शाहिर आझाद नायकवडी व महाराष्ट्र माझा परिवार संस्थेचे सदस्य विकास (बंटी शेठ ) भागवत, शिवनाथ  कापडी , बाजीराव कमानकर , मनोज लेंडवे , धोंडीराम रायते , मनोज ठाकरे , प्रकाश चतूर तसेच विहनहर्ता ऑईल अँड केमिकलचे रुपेश शेठजंजीरे     या मित्रांनी घेतली असल्याचे जाहिर केले . या संस्थेतील राजेंद्रधनावडे यांचे मित्र  हे समाजप्रबोधन व समाजात सुधारणा व्हावी यासाठी  कार्य करत आहेत . या वडीलांचे   छत्र हरपलेल्या पण शिक्षणाची जिद्द असलेल्या मुलींचे पालकत्व स्विकारल्या बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदने होत आहे . या वेळी एकनाथ ओंबळे, अमित दादा कदम , बोंडारवाडी धरण कृती समितीचे सर्व कार्यकर्ते  , परिसरातील.   ग्रामस्थ , महिला , कॉलेज व शाळांमधील विद्यार्थी -विद्यार्थिनी व शिक्षक वर्ग , तसेच राजेंद्रशेठ मित्रपरिवार मोठ्या संखेने उपस्थीत होते .                                       फोटो = पितृछत्र हरपलेल्या २ मुलीं सोबत राजेंद्र धनावडे त्यांचे कुटूंबिय व मित्रपरिवार

Post a Comment

0 Comments