Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जेसीबी चोरीचा गुन्हा उघड करून चार लाख पन्नास हजाराचा जे सी बी जप्त.

 जेसीबी चोरीचा गुन्हा उघड करून चार लाख पन्नास हजाराचा जे सी बी जप्त.

------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी

अमर इंदलकर

------------------------------------------

  केसरकर पेठ सातारा येथून जे सी बी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्यादी- प्रवीण सदाशिव चव्हाण. रा. पिंपरे बु. लोणंद.जिल्हा सातारा यांनी सातारा पोलीस स्टेशन मध्ये  दिली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेंद्र जगताप यांनी डी. बी पथकास सदरच्या गुन्ह्यातील जेसीबी व  गुन्हेगाराचा शोध घेण्याच्या सूचना आणि मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे माहिती प्राप्त करून सदर जेसीबी म्हसवे या ठिकाणी असलेचे समजले. सदर जेसीबी पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्त केला असून. आरोपीचे नाव संजय सर्जेरावं भोसले रा संभाजीनगर कोडोली सातारा. आहे. अधिक तपास हे पोलीस हवलदार नितीन घोडके करत आहेत. सदर कारवाई ही वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस उप निरीक्षक सुधीर मोरे, पोलीस  हवालदार सुजीत भोसले, निलेश जाधव, पोलीस ना. पंकज मोहिते, संतोष घाडगे, मच्छिन्द्र माने, सचिन रिटे, सुशांत कदम, इत्यादी पोलिसांनी केली.

Post a Comment

0 Comments