किसन वीरच्या डॉ. संग्राम थोरात यांनी केला मॉरिशस मध्ये शोधनिबंध सादर.

 किसन वीरच्या डॉ. संग्राम थोरात यांनी केला मॉरिशस मध्ये शोधनिबंध सादर.


-----------------------------------

 फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे

-----------------------------------

वाई दि. २४ शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर,  महात्मा गांधी इन्स्टिट्यूट, मोका मॉरिशस येथील मराठी विभाग व कला, वाणिज्य महाविद्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने  'भारत-मॉरिशस आंतरसांस्कृतिक व राजनैतिक संबंध: कला, संस्कृती व साहित्य विषयक चिंतन' या विषयावर आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय  चर्चासत्रात 'मॉरिशस मधील मराठी कथा' या विषयावर डॉ. संग्राम थोरात यांनी शोधनिबंध सादर केला. 

या प्रसंगी प्राचार्य डॉ. अशोक दौंड अध्यक्षस्थानी होते. तसेच मोका, मॉरिशस येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. मधुमती कुंजल यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ.  संग्राम थोरात यांनी या शोधनिबंधातून भारत आणि मॉरिशस या देशांचा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक व साहित्यिक अनुबंध उलगडून दाखविला तसेच मराठी साहित्यातील कथा, कादंबरी, कविता, नाटक या वाड.मयीन सेवेबद्दल मॉरिशियन लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. व मॉरिशन लोकांच्या मराठी भाषेवरील प्रेमाचा सोदाहरण दाखला दिला. 

सदर चर्चासत्रासाठी महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अहमदनगर, रत्नागिरी, पुणे अशा जिल्ह्यांतील व गोवा राज्यातील मराठी, हिंदी, इंग्रजी, वाणिज्य व भौतिकशास्त्राचे सुमारे ५० प्राध्यापक, प्राचार्य, प्राथमिक शिक्षक, वरिष्ठ लिपिक सहभागी झाले होते.

या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पारिजातकाचे झाड देवून सत्कार करण्यात आला व सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, प्राचार्य डॉ गुरूनाथ फगरे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. संग्राम थोरात यांचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.