Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बाजारभोगाव (ता. पन्हाळा ) येथील ग्रामपंचायत साठी ९०.१२./. टक्के चूरशीने मतदान.

 बाजारभोगाव (ता. पन्हाळा ) येथील ग्रामपंचायत साठी ९०.१२./. टक्के चूरशीने मतदान.

 

पन्हाळा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या  संवेदनशील असणाऱ्या बाजारभोगाव ग्रामपंचायतीसाठी  किरकोळ शाब्दिक चकमक वगळता  शांततेत  मतदान पार पडले.  येथे  ९०.१२% टक्के इतके  मतदान झाले.   

      तिन्ही आघाडीकडून एकाच गल्लीत आठ उमेदवार दिल्याने त्या गल्ली चुरस होती. त्यामुळे उमेदवार समर्थक मतदानासाठी मतदार बाहेर काढण्यासाठी लगबग करत होते. दुपारी एक च्या दरम्यान बाजारभोगावात मतदान केंद्रात वयोवृध्द व्यक्ती चे  मतदान कुणी करावयाचे यावर मतदान प्रतिनिधी ची शाब्दिक चकमक झाली.  ग्रामपंचायत मध्ये २४०९ पैकी २१७१ जणांनी मतदारांनी हक्क बजावला. प्रभागवार झालेले मतदान पुढीलप्रमाणे  प्रभाग एक  ८३५ पैकी ७४८ प्रभाग दोन  ७७६ पैकी ६९९ प्रभाग तीन ८३५ पैकी ७२४ इतके मतदान झाले.       

   येथील लोकनियुक्त सरपंचपद सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित असल्याने तिरंगी लढत झाली. सरपंचपदासाठी कै नितीन पाटील यांच्या पत्नी माया पाटील विरूद्ध नितीन हिर्डेकर यांच्या पत्नी सीमा हिर्डेकर यांच्या लढत होत असली तरी तिसऱ्या आघाडीच्या मनिषा खोत यांनी ही कडवी लढत दिली आहे. त्यामुळे सरपंचपदावर कोण बाजी मारणार ? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष आहे

फोटो ओळ -- बाजारभोगाव मतदानासाठी गर्दी-- बाजारभोगाव येथे मतदानासाठी मतदान केंद्रातील लागलेली रांग

Post a Comment

0 Comments