Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सावरगाव मेट येथे नुतन शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न.

 सावरगाव मेट येथे नुतन शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न.

------------------------------- 

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

भोकर प्रतिनिधी

------------------------------- 

भोकर तालुक्यातील मौजे सावरगाव मेट येथे शिवसेनेचे नुतन पदाधिकाऱ्यांचे यथोचित सत्कार गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले.

   भोकर तालुक्यातील मौजे सावरगाव मेट येथे दरवर्षी कार्तिक पौर्णिमा निमित्ताने येथे मोठा उत्सव व 

जत्रा भरते.येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुजा हवन करुन सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत भजनाच्या निनादात आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला. कार्तीकी पौर्णिमा समाप्ती निमीत भंडारा आयोजित करण्यात आला.याच कार्तीकी पौर्णिमा निमित्ताने शिवसेनेचे नुतन जिल्हा समन्वयक अँड परमेश्वर पांचाळ, उपजिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर व प्रेस व संपादक पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार उत्तम कसबे यांचा गावकऱ्यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच विठ्ठल जाधव, साईनाथ बंडोड, विठ्ठल देवोड, राजु बोंदलोड, प्रकाश बोंदीरवाड, सावकार सह आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments