Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अधिक्षक अभियंता राजपुत यांची दिवाळी जेलमध्ये साजरी होणार.

अधिक्षक अभियंता राजपुत यांची दिवाळी जेलमध्ये साजरी होणार.


-----------------------------------------

नांदेड : प्रतिनिधी
-----------------------------------------

येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता गजेंद्र राजपुत व वरिष्ठ लिपिक विनोद कंधारे यांचा जामीन अर्ज न्यायमुर्ती बांगर यांनी फेटाळून लावला असुन आता त्यांना दिवाळी जेल मध्ये साजरी करावी लागणार आहे. 
अधिक्षक अभियंता गजेंद्र राजपुत व वरिष्ठ लिपिक विनोद कंधारे यांच्या जामीन अर्जावर ९ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. न्यायालयात राजपुत व कंधारे यांच्या वतीने जेष्ठ व नामांकित वकिलांची फौज न्यायमूर्ती यांच्या समोर युक्तीवाद करुन जामीन द्यावा यासाठी खिंड लढवली. न्यायमुर्ती बांगर यांनी ९ नोव्हेंबर रोजी निकाल देण्याऐवजी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. 
न्यायमुर्ती बांगर यांनी जामीन अर्ज फेटाळून लावलाने त्यांना वरच्या न्यायालयात धाव घेणार आहेत. आता सुट्टीच्या न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. तोपर्यंत अधिक्षक अभियंता गजेंद्र राजपुत व वरिष्ठ लिपिक विनोद कंधारे यांना आपलीं दिवाळी जेल मध्ये साजरी करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments