राधानगरी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या ४३ केंद्रावर तयारी पूर्ण... तहसीलदार अनिता देशमुख.
राधानगरी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या ४३ केंद्रावर तयारी पूर्ण... तहसीलदार अनिता देशमुख.
-------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------------
राधानगरी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुक ४३ केंद्रावरती ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. याची तयारी पूर्ण झाली असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी अनिता देशमुख यांनी केले.
राधानगरी तालुक्यातील फेजिवडे, न्यू करंजे,फराळे , बारडवाडी , चांदेकरवाडी, मांगेवाडी , पालकरवाडी ,कसबा वाळवे , सरवडे या नऊ ग्रामपंचायतीसह दोन पोटनिवडणूक कोदवडे व म्हासुर्ली अशा अकरा ग्रामपंचायतीच्या 43 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याची पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती राधानगरीच्या तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी अनिता देशमुख यांनी माहिती दिली.
मतमोजणी ६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी होणार आहे.
Comments
Post a Comment