असळजमध्ये निवाराशेड नसल्याने प्रवाशांचे हाल.
असळजमध्ये निवाराशेड नसल्याने प्रवाशांचे हाल.
------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
गगनबावडा प्रतिनिधी
योगेश नागप
------------------------------------------
या राष्ट्रीय महामार्ग, कोल्हापूर-
खारेपाटण मार्गावरील असळज (ता. गगनबावडा) येथील असळज कॅन्टीन थांब्यावर निवाराशेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. येथील बस थांब्यांवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने त्वरित निवाराशेड उभारून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. निवारा शेड सुमारे १५ वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरणात नाहीसे झाले, तेव्हापासून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावरील गगनबावडा तालुक्यातील असळज हा मुख्य थांबा आहे. गगनबावडा तालुक्यातील असळज ही पश्चिम भागातील मोठी बाजारपेठ आहे. येथे जवळच साखर कारखाना व शैक्षणिक सुविधा असल्याने रोज विद्यार्थ्यांसह हजारो प्रवाशी येथून ये-जा करत आहेत. परंतु प्रवाशांच्या सुविधेसाठी येथे निवारा शेड उभारलेले नाही.
Comments
Post a Comment