भाजीपाला ग्रूप शेतकरी बांधवांकडून पोलीस अधिक्षकांचा सत्कार.

 भाजीपाला ग्रूप शेतकरी बांधवांकडून पोलीस अधिक्षकांचा सत्कार.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

परभणी प्रतिनिधी  

--------------------------------

पोलीस अधीक्षक रागसुधा आर. व तत्कालीन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बालकांच्या हक्कांसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना प्रशासनाच्या वतीने  राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल परभणीतील भाजीपाला ग्रूप  शेतकर्‍याच्या वतीने  त्यांंचा सन्मान करण्यात आला. 

पोलीस अधीक्षक रागसुधा यांच्या शासकीय निवासस्थानी जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांनी पुष्पगुच्छ व शेतीतील गीर गायीचे तूप, संत्रा, पेरू, भाजीपाला, सीताफळ आदी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. शासकीय निवासस्थानी पिकविलेल्या पिकांबाबत यावेळी चर्चा झाली.  तामिळनाडू विद्यापीठ हे उसावर व हळदीवर खूप सुंदर काम करत आहे. तुम्ही जर तामिळनाडूला गेलात तर त्या विद्यापीठांमधील सर्वच नियोजन व तेथे जे काही पाहण्यासारखे आहे ते पाहण्यासाठी मी मदत करेल. जिथे कुठे शेतकर्‍यांची फसवणूक होत असेल त्याठिकाणी पण मी आपल्याला मदत करण्यासाठी तयार आहे असे पोलीस अधीक्षकांनी या बैठकीत आश्वासन दिले. यावेळी शेतकरी पंडीतराव थोरात, जनार्धन आवरगंड, प्रकाश हरकळ, रामेश्वर साबळे, तुळशीराम दळवी, सुरेश काळे, रमेश पवार, रमेश राऊत, विद्याधर संगई, संभाजी गायकवाड, अशोक खिल्लारे  आदी शेतकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.