मुरगुड येथे कला मंच आयोजित छोटे मावळे गड किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न.

 मुरगुड येथे कला मंच आयोजित छोटे मावळे गड किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न.

--------------------------------

मुरगुड प्रतिनीधी

जोतीराम कुंभार

--------------------------------

किल्ले बांधणी करण्यापूर्वी किल्ल्यांविषयीचा अभ्यास महत्त्वाचा-शस्त्र अभ्यासक अमरसिंह पाटील

 ज्या किल्ल्याची बांधणी करणार आहोत त्या किल्ल्याविषयीचा आपला अभ्यास असणे तसेच त्या किल्ल्यावरील विविध ठिकाणांची  पाहणी करून मग गड किल्ले बांधल्यास त्यामध्ये जिवंतपणा उतरेल असे शस्त्र अभ्यासक अमरसिंह पाटील सोनगे यांनी सांगितले ते मुरगुड येथील नवकला मंच आयोजित आम्ही छोटे मावळे गड किल्ले बांधणी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभामध्ये बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी अनेक गड किल्ल्यांची बांधणी केली त्या गड किल्ल्यांना आपण नक्कीच भेट दिली पाहिजे कारण त्या गडावरील प्रत्येक वास्तू छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहेत आहे.

अध्यक्षीय मनोगता मध्ये बोलताना मुरगुड पोलीस स्टेशन एपीआय दीपक भांडवलकर यांनी सांगितले की ज्याप्रमाणे महाभारत रामायण यामध्ये श्रीकृष्ण आणि रामाची गाथा सांगितली आहे त्याच पद्धतीने शिवभारत ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात गाजवलेल्या पराक्रमाची गाथेचे वर्णन केले आहे तो छत्रपती शिवरायांचा इतिहास प्रत्येकाने जागवायलाच पाहिजे. यामध्ये मुरगुड शहरातील 40 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी किती किल्ले बांधले, स्वराज्य निर्माण करताना त्यांनी कसा पराक्रम गाजवला आणि त्यांचे कार्य नवीन पिढीला समजावे तसेच त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने नवकला मंच च्यामाध्यमातून ही स्पर्धा घेण्यात आली होती. मुरगुड शहरांमधून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी आणि कलाशिक्षक संभाजी भोसले या परीक्षकांनी हे अवघड काम पूर्ण केले. राज तांबट, अतुल कुणकेकर, सुहास देवळे हे स्पर्धेचे प्रायोजक होते. शहरामध्ये प्रथमच दुसऱ्या वर्षीही पहिल्या सहा नंबर सह सर्वोत्कृष्ट दहा जणांना शिल्ड वितरण आणि उर्वरित सर्वांना सहभाग प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश फी आकारण्यात आली नव्हती.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे गजाननराव गंगापुरे, प्रदीप वर्णे, ओंकार पोतदार, विनायक येरुडकर, सिद्धांत पोतदार,अक्षय पोतदार ,दिग्विजय येरूडकर , सर्जेराव भाट , जगन्नाथ गुरव सोमनाथ यरनाळकर ,मयूर सावर्डेकर, सुशांत महाजन, सिकंदर जमादार, आर.डी चौगुले यांच्यासह स्पर्धकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.


स्पर्धेमधील विजेते पुढील प्रमाणे

शर्विल दीपक मेंडके- प्रथम क्रमांक 

सूरज बापू ताटे-दृतीय क्रमांक

प्रतीक एकनाथ हासबे-तृतीय क्रमांक

समर्थ अमोल येरूडकर -उत्तेजनार्थ

शिवबा ग्रुप माधवनगर -उत्तेजनार्थ

-नवमहाराष्ट्र बाल मंडळ उत्तेजनार्थ


सर्वोत्कृष्ट दहा क्रमांक पुढील प्रमाणे


निरंजन नामदेव संकपाळ 

प्रज्योत प्रदीप नाकोळे

आदित्य विजय रजिगिरे

जयेश युवराज मेंडके

मल्हार संदेश म्हेतर

प्रतीक सचिन मगदूम

संयुक्त जुना पोलिस स्टेशन मित्र मंडळ

रुद्र बाबर

राजवीर प्रदीप सोरप

यश सूरज भाट

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.