Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

तारळे परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल.

 तारळे परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल.


------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

अमर इंदलकर

------------------------------------

तारळे: परिसरमधील एक अल्पवयीन मुलीवर सायबर कॅफेत अत्याचार करतानाचे छायाचित्रे व्हायरल करून तिच्या बदनामीची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल दहा महिन्यापासून प्रकार सुरू असल्याचे संबंधित मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून समोर आले.

   अझर नदाफ (वय १९ रा.   तारळे) व (साहिल बशीर वय ३० रा. कोंजवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

   उंब्रज पोलिसात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी कुटुंबासह परिसरातील एका गावात एकत्र राहण्यास आहे. जानेवारी मध्ये ती मैत्रिणी सोबत बाहेर गावाच्या एका सायबर कॅफेत गेली होती. त्यावेळी अझरने ओळखीचा फायदा घेत तेथे बळजबरी करत अत्याचार केला. यावेळी साहिलने फोटो काढले. त्यानंतर साहिलने आठ - दहा दिवसानंतर अझर चांगला मुलगा नाही त्याचे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे त्याचे तुला सगळे सांगतो. असे सांगत तिला पुन्हा कॅफेत बोलावून घेतले. विरोध करून सुद्धा साहिलने जबरदस्तीने अत्याचार केला. नंतर साहिलने अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन फोटो व्हायरल करण्याची धमकी देत. जबरदस्तीने अत्याचार केले. अंधारात, रानात नेऊन अत्याचार केले. अखेर त्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने त्याची माहिती घरात दिली. त्यानंतर आई सोबत जाऊन उंब्रज पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास फौजदार अनिल पाटील हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments