नांदेड शहरात पोलिसांची कोंबिग.

 नांदेड शहरात पोलिसांची कोंबिग.

---------------------------------

नांदेड : प्रतिनिधी

---------------------------------

शहरातील पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी रात्री अकरा वाजता कोंबिग आपरेशन राबवून विविध प्रकारच्या गुन्हे दाखल करुन आरोपींची झाडाझडती घेतली.

दिवाळी सणाच्या निमित्ताने काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी म्हणून १० नोव्हेंबरच्या रात्री शहरातील सहा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अधिकारी व कर्मचारी यांनी रात्री ११ वाजता कोंबिग आपरेशनला सुरवात केली. १६ ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची व रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचा शोध घेतला. पहाटे चार वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती. वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. मोटार वाहन नियम तसेच इतर प्रकारच्या ७६ कसेस करण्यात आल्या. रात्रभर २८ पोलिस अधिकारी व १०१ पोलिस कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. ही नाकाबंऊ पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक, अबिनाश कुमार, धोरणे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.