सावधान साताऱ्यात बोखाळले आहेत फसवेगिरीचे धंदे.

 सावधान साताऱ्यात बोखाळले आहेत फसवेगिरीचे धंदे.

----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा  


----------------------------------------

फसवेगिरीचे धंदे बोखाळत चालले आहेत. पैकी हे धंदे करणारांचे स्वरूप हे दरोड्या पेक्षा वाईट असून, त्यांना त्यामानाने कायदेशीर कलम हे शितीलच लागू होत आहे. हे धंदे आणि ह्या धंद्याचं स्वरूप -(1) साताऱ्यातील गाड्यांच्या गोडाऊन मधील गाड्या दाखवणे आणि फायनान्स करून देतो, गाडी कमी किंमतीत देतो असे सांगून टोकन घेणे पैसे घेणे आणि फसवणूक करणे अथवा कोणाच्या तरी व्यक्तिगत मालकीची गाडी( विकायची असल्यास )स्वतःला घ्यायचीय हे गाडी मालकाला भासवून परस्पर तिऱ्हाइतकडून स्वतःचीच गाडी असल्याचे भासवून पैसे घेणे आणि फसवणे.(2) बनावटिकरण करणे - खोटे आधार कार्ड, खोटे मृत्यूपत्र करणे,जमिनीच्या व्यव्हारात जागामालक म्हणून तोतया कुणालाही उभे करणे,फक्त साठेखत मारून पैसे उचलणे. बनावट मुक्तह्यार पत्र करणे, खोटे दस्त करणे,(3) फायनान्स कडून घेतलेली गाडी हप्ते न-फेडता नंबर प्लेट खोटी लावून चालवणे, (4) गाडीच्या व्यवहारात मोगाम नोटऱ्या करून देणे आणि पैसे घेऊन फसवणूक करणे. असले लुटपाटीचे धंधे मोळाचा ओढा सातारा येथून एक- दोन-तीन मास्टर माईंड चालवत आहेत. त्यांना वेळीच लगाम पोलिसांनी लावावा. काही राजकीय लोकांची नावे घेऊन त्यांचे नाव हे लोक खराब देखील करत आहेत.कोणी पत्रकार त्यांच्याविरोधात लिखाण करत असेल तर त्या पत्रकारांवार दबाव आणत आहेत.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.