Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

उपक्रमशील वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांचे कार्य आदर्शवत.- डॉ अर्जुन कुंभार.

 उपक्रमशील वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांचे कार्य आदर्शवत.- डॉ अर्जुन कुंभार.

----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड प्रतिनिधी 

जोतीराम कुंभार

----------------------------------------

  सामाजिक बांधिलकी जोपासत एक आगळी वेगळी भाऊबीज साजरी करणाऱ्या वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांचे कार्य समाजात दिपस्तंभासारखे आहे असेप्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन कुंभार यांनी केले ते येथील वनश्री रोपवाटिकेच्या वतीने आयोजित सार्वजनिक भाऊबीज कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बहुजन जागृती संस्थेचे संस्थापक एम टी सामंत होते. सखाराम सावर्डेकर मयुर आंगज पाप्पालाल जमादार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला .

डॉ.कुंभार पुढे म्हणाले, वनश्री रोपवाटिकेच्या माध्यमातून गेली १३ वर्षे सुरु असणारी ही सर्वात मोठी सामाजिकता जोपासणारी भाऊबीज होय .

 आज या कार्यक्रम ठिकाणी आपण आरोग्य विभाग भगिनींना प्रतिनिधीक स्वरूपात प्रतिवर्षी प्रमाणे साडी चोळी आणि दिवाळीचा फराळ भाऊबीज ओवाळणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते . याचबरोबर मुरगूड व परीसरातील ऊस तोडणी कामगार भगिनी व खुदाई कामगार भगिनी यांच्या वस्तीतळावर व वंदुरच्या वृद्ध सेवाश्रमात जाऊन श्री सुर्यवंशी हे भाऊबीज साजरी करणार आहेत. १५० साड्या ओवाळणी साठी त्यांनी आणल्या असून यापेक्षा मोठी भाऊबीज ती कोणती असू शकते .

    कार्यक्रमाचे स्वागत - प्रास्ताविक प्रविण सुर्यवंशी यांनी तर  आभार ओंकार पोतदार यांनी मानले 

वृक्षमित्र सुर्यवंशी यांनी वनश्री रोपवाटिकेच्या माध्यमातून आतपर्यंत सुमारे ४ लाख रोपांचे मोफत वाटप केले आहे . प्रतिवर्षी निराधार निराश्रीतांना थंडीच्या दिवसात मायेची उब देणारे ब्लॅकेट वाटप करतात, वृक्ष रक्षाबंधन कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश कृतीतून देतात . गाडगेबाबा पुणतिथी दिनी उपेक्षित कष्टकऱ्यांचा सन्मान करतात . राष्ट्रियसणातून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करतात . या सामाजिक उपक्रमात भाऊबीज हा ही एक सामाजिक बांधिलकी जोपासणारा उपक्रम उपस्थिनांच्या मनान भावनिकता निर्माण करून जातो .

   यावेळी  सदाशिव एकल   सिकंदर जमादार दादू बरकाळे,पांडुरंग सुर्यवंशी, महादेव वागवेकर, शिवानंद एकल , सचीन सुतार , मृत्युंजय सुर्यवंशी, विशाल पाटील, प्रथमेश सुर्यवंशी, प्रदिप वर्णे, सिद्धेश सुर्यवंशी, वनश्री रोपवाटिका संचालिका सौ निता सुर्यवंशी यांच्या सह आरोग्य विभागाच्या महिला भगिनी उपस्थित होत्या .

Post a Comment

0 Comments