Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्राध्यापक प्रकाश पाटील यांच्या "अंधार वाटेवर" या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.

 प्राध्यापक प्रकाश पाटील यांच्या "अंधार वाटेवर" या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.

-----------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

करवीर प्रतिनिधी

रोहन कांबळे 

------------------------------

ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रसुल सोलापूरे बहुउद्देशीय संस्था, महागाव जिल्हा. कोल्हापूर यांच्या वतीने नुकतेच निवडक साहित्यकृतींना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले. विविध साहित्य प्रकारांतून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.यामधील कविता साहित्य प्रकारातून कोल्हापूर जिल्ह्यातील कुडित्रे ( ता.करवीर ) येथील डी.सी.नरके विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक प्रकाश पाटील यांच्या " अंधार वाटेवर " या काव्यसंग्रहाची विशेष पुरस्कारासाठी परीक्षण समितीने निवड केली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रसुल सोलापूरे यांनी पुरस्कारा संबंधी घोषणा नुकतीच केली. या काव्यसंग्रहातून माती, नाती आणि मती जागवता-जागवता शेती, शेतकरी, निसर्ग, पाऊस, आई-बाप, जीवन, शिक्षण, आठवणी, गाव-खेड्याचा बदलता चेहरा-मोहरा आणि संत विचारातून अध्यात्माची लागलेली गोडी असे नानाविध विषय त्यांनी कवितेतून साकारले आहेत. त्यांच्या या काव्यसंग्रहास मिळालेला हा पहिलाच राज्यस्तरीय पुरस्कार असल्याने परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव व कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments