Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अहंती कदमची राज्य बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड.

 अहंती कदमची राज्य बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड.

----------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

जावळी प्रतिनिधी 

शेखर जाधव

----------------------------------------------

मेढा प्रतिनिधी: जावळीची राजधानी मेढा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेची विद्यार्थिनी अहंती संतोष कदम हिची १७ वर्षाखालील वयोगटातील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

शिरवल हळवल ता. कणकवली जि. सिंधूदुर्ग येथे पार पडलेल्या विभागीय स्पर्धेमध्ये पाच जिल्ह्यातील स्पर्धकांमधून अहंती कदम हिने तिसरा क्रमांक मिळवित चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत अहंती सहापैकी साडेचार गुण मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेत तसेच आपली बुद्धिबळ खेळण्याची आवड जोपासत अहंतीने मिळविलेल्या या यशाबद्दल पंचायत समिती जावलीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, प्रशिक्षक प्रणव टंकसाळे तसेच मेढा शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी तिचे अभिनंदन करत तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

फोटो: शिरवल येथे पार पडलेल्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत खेळताना अहंती कदम

Post a Comment

0 Comments