Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

छगन भुजबळ यांच्याआरक्षण विरोधी फक्त वकत्त्वाचा मुरगूड येथे निषेध.

 छगन भुजबळ यांच्याआरक्षण विरोधी फक्त वकत्त्वाचा मुरगूड येथे निषेध.

------------------------------------

मुरगूड  प्रतिनिधी

जोतीराम कुंभार

-----------------------------

नुकतीच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण संदर्भात मराठा आरक्षणा विरोधी वक्तव्य करून ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण केल्याचा आरोप करत मुरगुड येथील सकल मराठा समाजातर्फे त्यांचा निषेध करण्यात आला तसेच त्यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना ओंकार पोतदार यांनी सांगितले की ओबीसी आणि मराठा समाज गुण्या गोविंदाने या महाराष्ट्र मध्ये नांदत आहेत छगन भुजबळ यांच्यासारखे जबाबदार मंत्री आरक्षण विरोधी भूमिका घेऊन दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत याच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार यांनी जातीनिशी लक्ष घालावे त्यांच्यामुळे दोन समाजामध्ये वाद निर्माण होऊन कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जावा यावेळी दत्ता मंडलिक, कॉम्रेड अशोक चौगुले यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी आंदोलकांनी छगन भुजबळ यांचा पुतळा आंदोलन स्थळे आणला होता पोलिसांनी तो आंदोलकांकडून काढून घेतला. अमर सनगर, संजय भारमल मंडलिक, 

मयूर सावर्डेकर सर्जेराव भाट, विशाल मंडलिक, राजेंद्र चव्हाण, सचिन मांगले,सुरेश साळोखे, निशांत जाधव, पृथ्वीराज चव्हाण, रणजीत मोरबाळे,संकेत भोसले, विक्रम गोधडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुरगुड पोलीस स्टेशन पीएसआय राहुल वाघमारे प्रशांत गोजारी यांच्यासह मुरगूड पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

0 Comments